मुंबईकर 'अब्दुल्ल खान'ला Google चं 1.2 कोटीचं पॅकेज; ना जॉब अ‍ॅप्लिकेशन, ना IIT चा विद्यार्थी, पहा तरीही कशी मिळाली इतकी मोठी संधी
Google Representational image. (Photo Credits: Getty images)

मुंबई आयआयटीच्या विदयार्थ्यांना गूगल (Google), अ‍ॅपल (Apple), मायक्रोसॉफ्ट (Microsoft) या कंपन्यांमध्ये कोटींची पॅकेजेस मिळणं हे काही नवीन नाही. पण मुंबईच्या मीरा रोड भागातील श्री एल आर तिवारी इंजिनिअरिंग कॉलेज(Shree LR Tiwari Engineering College)च्या अब्दुल्ल खान (Abdullah Khan)या विद्यार्थ्याला गूगलने 1.2 कोटीचं पॅकेज ऑफर केलं आहे. 21 वर्षीय अब्दुल्ल सप्टेंबर महिन्यापासून गूगलच्या लंडन ऑफिसला (Google London Office) जॉईन करणार आहे.

प्रतिष्ठीत कॉलेज, विद्यापीठामध्ये अ‍ॅडमिशन मिळवण्यासाठी दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांवर अभ्यास आणि निकाल, विशिष्ट % मार्क्स मिळावेत याचा दबाव असतो. केवळ IIT मध्ये प्रवेश मिळाला नाही म्हणून अनेकांच्या मेहनतीवर, स्वप्नांवर पाणी फिरलं आहे. पण अब्दुल्ल खान या सार्‍यांना अपवाद ठरला आहे. अब्दुलच्या गूगलमधील ऑफरचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्याने या जॉबसाठी अर्जच केला नव्हता. competitive programming challenges च्या साईटवर अब्दुल्लचं प्रोफाईल पाहून गूगल कंपनीने त्याला फोन करून इंटरव्ह्यू साठी बोलावून घेतलं.

टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना अब्दूल्लने दिलेल्या माहितीनुसार, गूगलकडून फोन येणं हे अनपेक्षित होतं. ज्या स्पर्धेत अब्दुल्ल उतरला होता ती देखील नोकरी शोधण्यासाठी नसून केवळ मजेचा एक भाग म्हणून केलेला प्रयत्न होता. सुरूवातीला गूगल कंपनीकडून काही ऑनलाईन इंटरव्ह्यू झाले नंतर लंडन ऑफिसमध्ये स्क्रिनिंग टेस्ट झाली. गलेलठ्ठ पगार देणाऱ्या टॉप 7 कंपन्या; नोकरी करणाऱ्याची हमखास चांदी

अब्दुल्लला 'कोडिंग़' करणं आवडतं. त्यांचं शालेय शिक्षण सौदी अरेबियामध्ये झालं. त्यानंतर तो मुंबईमध्ये आला. मुंबई आयआयटीमध्ये प्रवेश मिळवता आला नाही. आता गूगलमध्ये त्याला तब्बल 1.2 कोटीचं पॅकेज ऑफर करण्यात आलं आहे. तो Reliability Engineering Team सोबत काम करणार आहे. अब्दुल्लचा हा प्रवास अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा ठरणार आहे. तुमच्याकडे कोणत्या कॉलेजची डिग्री आहे त्यापेक्षा तुमचं टॅलेंट काय आहे? यावर विश्वास ठेवा.