Boris Johnson Resigns: बोरिस जॉनसन इंग्लंडच्या पंतप्रधान पदावरुन पायउतार होणार, काँझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेतेपादाचाही राजीनामा
Boris Johnson | (Photo Credit - Facebook)

इंग्लंडचे (England) पंतप्रधान बोरिस जॉनसन (Boris Johnson) पदावरुन पायउतार होणार आहेत. ब्रेक्झिट मुद्दा आणि कोविड महामारी काळात बोरिस जॉनसन यांचा कारभार बराचसा संभ्रम निर्माण करणारा ठराल होता. त्यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोपही मोठ्या प्रमाणावर झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर टीकेचा भडीमारही झाला होता. अखेर त्यांनी राजीनामा द्यायचा निर्णय घेतला. बोरिस जॉनसन हे कंझर्व्हेटिव्ह (Conservative Party) पक्षाचे नेतृत्व करत होते. गुरुवारी (7 जून) त्यांनी त्यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेतेपद सोडले.

बोरिस जॉनसन (वय 58) यांनी म्हटले आहे की, ते पदावरुन पायऊतार होऊ इच्छितात. बोरिस जॉनसन यांच्या विरोधात पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांनी राजीनामा दिला. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारुन त्यांनी पक्षाचे नेते पद सोडण्याची घोषणा केली. मात्र, पर्यायी नेतृत्व मिळेपर्यंत किंवा तशी घोषणा होईपर्यंत आपण पंतप्रधान पदावर कायम राहू असेही जॉनसन यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, बोरिस जॉन्सन होते भारताचे जावई; जाणून घ्या नातं कस? )

ट्विट

विरोधी पक्षनेते केयर स्टारमर यांनी त्यांच्या बोरिस जॉनसनयांच्या राजीनाम्याचे स्वागत केले. स्टारमर म्हणाले की "सरकारमध्ये योग्य बदल" आवश्यक आहे आणि जॉन्सन यांनी पायउतार होण्याची घोषणा केली असली तरीही ते पुढील काही महिने खूर्चीला चिकटून राहणार आहेत. त्यापेक्षा संसदेत सरळ अविश्वास ठराव आणला जावा.