New Species of Snake: जगातील सर्वात मोठ्या सापाची प्रजाती संशोधकांनी शोधून काढली आहे. अभ्यासकांना सापाची ही प्रजाती ॲमेझॉन जंगलात ( Amazon Rainforest) आढळून आली. या प्रजातीला नॉर्दर्न ग्रीन एनाकोंडा (Giant Anaconda) असे संबोधण्यात आले आहे. अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार जगभरात नोंद न झालेला आणि आकाराने सर्वात मोठा, लांब आणि तितकाच वजनतार असा हा साप (अजगर) आहे. ॲमेझॉन रेनफॉरेस्टमध्ये नव्याने सापडलेल्या महाकाय एनाकोंडाच्या प्रजातीने शास्त्रज्ञांना चकीत केले आहे. ही प्रजाती 7.5 मीटर लांबीपर्यंत वाढणारी आणि जवळपास 500 किलोग्रॅम वजनाची आहे. आकाराच्या बाबतीत बोलायचे तर ती आतापर्यंत ज्ञात असलेल्या ॲनाकोंडाच्या सर्व प्रजातींना मागे टाकते.
जगातील सर्वात मोठा एनाकोंडा शोधली प्रजाती
संशोधक आतापर्यंत ॲनाकोंडाच्या चार प्रजातींशी परिचित होते. ज्यामध्ये ग्रीन एनाकोंडा सर्वात मोठा म्हणून गणला गेला होता. जो दक्षिण अमेरिकेतील विविध उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये आढळतो. ज्यात ऍमेझॉन, ओरिनोको आणि एसेक्विबो नद्यांच्या खोऱ्यांचा समावेश आहे, तसेच या प्रदेशातील लहान पाणलोटांचा समावेश आहे. दरम्यान, सांगीतले जात आहे की, प्रथमच आढळळेला हा एनाकोंडा जवळपास चारचाकी वाहनाच्या टायर इतका मोठा आहे. 'डेली मेल'ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, हा एनाकोंडा जगातील सर्वात मोठा साप म्हणून पुढे आला आहे. ज्याचे डोके मानवाच्या डोक्याएवढे असते. अभ्यासकांनी या अनाकोंडाबद्दल जारी केलेल्या फुटेजमध्ये तो पाण्यात पोहताना दिसतो. (हेही वाचा, Viral Video: बर्फातून तयार केला विशाल अॅनाकोंडा, व्हिडिओ पाहून साप खरा की खोटा यावर विश्वास बसणार नाही)
ग्रीन एनाकोंडाबाबत पुष्टी
वाचकांच्या माहितीसाठी असे की, आतापर्यंत अमेझॉनच्या जंलामध्ये अनाकोंडाच्या एकाच प्रजातीला मान्यता देण्यात आली होती. ज्याला गिनाट एनाकोंडा म्हणूनही संबोधले जाते. या महिन्याच्या जैवविविधतेसंबंधी प्रकाशित होणाऱ्या पेपरमध्ये नॉर्दर्न ग्रीन एनाकोंडाबाबत पुष्टी करण्यात आली आहे. जगातील सर्वात मोठ्या सापाबद्ल प्रोफेसर फ्रीक वोंक यांनी म्हटले आहे की, नऊ देशांच्या 14 वैज्ञानिकांनी मिळून जगातील सर्वात मोठ्या एनाकोंडाचा शोध लावला.
ॲनाकोंडा त्याच्या विजेच्या-वेगवान हालचाली आणि प्राणघातक शिकार तंत्रासाठी प्रसिद्ध आहेत.विशेषत: दक्षिण अमेरिकेतील नद्या आणि आर्द्र प्रदेशात आढळणाऱ्या प्राण्यांची ते शिकार करतात. शिकार पूर्ण गिळण्यापूर्वी त्यांना आकुंचन पावण्याची आणि गुदमरवण्याची त्यांची क्षमता ही त्यांच्या शिकारी वर्तनाची खूबी मानली जाते. उत्तरेकडील हिरवा ॲनाकोंडा ही एक वेगळी प्रजाती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महत्त्वपूर्ण अभ्यासामध्ये अनेक दशके विस्तृत संशोधन करण्यात आले आहे. मात्र, आता एक नवीच प्रजाती अभ्यासकांना आढळली आहे. नव्या प्रजातीबद्दल सखोल संशोधन अद्याप बाकी आहे.