England Lockdown: इंग्लंडमध्ये संपूर्ण लॉकडाऊन,  Coronavirus संकटामुळे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांची घोषणा
Boris Johnson | (Photo Credits: Facebook)

Coronavirus संकटातून अवघे जग बाहेर पडते आहे असे वाटत असतानाच कोरना व्हायरसचा नवा स्ट्रेन (New coronavirus strain) सापडला आणि पुन्हा भीतीची छाया दाटली. इंग्लंड देशात तर पुन्हा एकदा नव्याने लॉकडाऊन (England Lockdown) लागू करण्यात आला आहे. पंतप्रधान बोरिस जॉनसन ( Boris Johnson) यांनी ही घोषणा केली आहे. त्यांनी सोमवारी सांगितले की, इंग्लंडमध्ये जवळपास 56 मिलियन लोक संपूर्ण लॉकडाऊनमध्ये परततील. हा लॉकडाऊन (Complete Lockdown in England) येत्या फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापर्यंत असेल असेल असे जॉनसन यांनी म्हटले आहे.

बोरिस जॉनसन यांनी देशाला (इंग्लंड) उद्देशून केलेल्या संबोधनात म्हटले आहे की, इंग्लंडमध्ये बुधवारपासून पुन्हा लॉकडाऊन लागू राहिल. त्यामुळे बुधवारपासून पुन्हा सर्व शाळा बंद असतील. स्कॉटलंडकडून झालेल्या घोषणेनंतर जॉनसन यांनी ही घोषणा केली आहे.

इंग्लंडमध्ये कोरोनाव्हायरसपासून होणारा मृत्यू दर सर्वाधिक आहे. त्यामुळे एकूण लोकसंख्येच्या तीन चथुर्थांश लोक म्हणजे जवळपास 44 मिलियन लोक अडचणींचा सामना करत आहेत. जॉनसन यांनी पुढे म्हटले आहे की, सोमवारी कोविड संक्रमीतांची संख्या जवळपास 27,000 आहे. ही संख्या गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात कोरोना लाटेत असलेल्या कोरोना संक्रमितांपेक्षा 40% अधिक आहे. गेल्या मंगळवारी 80,000 पेक्षा अधिक लोक केवळ 24 तासात संक्रमित आढळले आहेत. (हेही वाचा, Maharashtra: ब्रिटेन येथून आलेल्या 8 जणांना COVID19 च्या नव्या रुपातील स्ट्रेनची लागण, संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला जात असल्याची राजेश टोपे यांची माहिती)

पुढे बोलताना जॉनसन यांनी म्हटले आहे की, इंग्लंडमध्ये बहुतांश भागात आगोदरपासूनच प्रतिबंधात आहे. त्यामुंळे सहाजिकच आहे की, या अडचणीच्या काळात लोकांना अधिक कठोर नियम पाळावे लागतील. या वेळीही लावण्यात आलेला लॉकडाऊन आगोदरच्या लॉकडाऊनप्रमाणेच आहे.

दरम्यान, अत्यावश्यक सेवा, काम यासाठी लोक घराबाहेर पडू शकतात. ज्यांना वर्क फ्रॉम होम शक्य नाही, ज्यांना व्यायाम, वैद्यकीय सेवा सुविधा, कौटुंबीक हिंसाचार यांबाबत काही गरज असल्यास नागरिक घराबाहेर पडू शकतात, असेही जॉनसन यांनी म्हटले आहे.