
Milkayla Campinos Death News: सद्या सोशल मीडियावर मिकायला कॅम्पिनोस (Milkayla Campinos) या टिकटॉक स्टारच्या मृत्यूबद्दल चर्चा चालू आहे. सोशल मीडियावरील (Social Media) युजर्सना तिच्याबद्दल जाणून घेण्यास उत्सुकता लागली आहे. सोशल मीडियावर तिच्या मृत्यूच्या पोस्ट व्हायरल होत आहे. ह्या अफवा खऱ्या आहेत की नाही याकडे युजर्सचे लक्ष लागले आहेत. अजून देखील तिच्या घरच्यांनी तीला मृत घोषित केले नाही असे सांगण्यात आले आहे. सोशल मीडियावर मिकायला कॅम्पिनोसचा चाहता वर्ग मोठा आहे.
मिकायला कॅम्पिलनोस कोण आहे ?
अवघ्या १६व्या वर्षात मिकायलाने मोठं यश मिळवलं. कॅनेडियन टिकटॉक स्टार आहे. सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असल्यामुळे तीचा चाहता वर्ग देखील खुप आहे. मिकायला नेहमी सोशल मीडियावर जीवनशैली संदर्भात वेगवेगळे व्हिडिओ पोस्ट करत असते. त्यामुळे तीचा चाहता वर्ग नेहमीच तीच्याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असतो. मिकायलाला इन्स्टाग्रामवर दोन मिलीयन फोलोवर्स आहे. आताच्या पिढीसाठी एक लोकप्रिय व्यक्तींमध्ये मिकायलाचे नाव समोर येते.
मिकायला मृत की जिवंत ?
मिकायला गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सक्रिय दिसत नाही. त्यामुळे तिच्या चाहता वर्ग तिच्याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहे. काही दिवसांपुर्वी रेडिट वेबसाईटवर तीच्या संदर्भात एक व्हिडिओ पोस्ट समोर आली. त्या व्हिडिओत ती एका मुलासोबत विचित्र चाळे करत असताना दिसली. याचदरम्यान ती बेपत्ता झाल्याचे समोर येत आहे. ह्या घटनेमुळे लोकांनी तीच्या मृत्यूची अफवा पसरवली. तीला तीच्या व्हिडिओ संर्दभात ऑनलाईन छळ होत असल्याचेही सांगितले त्यामुळे तीने आत्महत्या केल्याचे लोकांनी सांगितले.
HORL ह्या मीडिया प्रकाशनाने तिच्या मृत्यू संर्दभात लेख प्रकाशित केला. शिवाय तिच्या घरांनी आणि व्यवस्थापकांनी तीला मृत घोषित केल नाही.