UK Southport Stabbing: युकेच्या साउथपोर्ट शहरातील मुलांच्या क्लबमध्ये (Children's Club) सोमवारी दुपारच्या सुमारास सामुहिक हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. या सामुहिक हल्ल्यात आठ मुले जखमी झाले आहे. तर एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच, साउथपोर्टमधील हार्ट स्ट्रीटवर झालेल्या हल्ल्याचे पोलिसांनी प्रत्युत्तर दिले. पोलिसांनी हल्ला केलेल्या आरोपीला अटक केले आहे. (हेही वाचा- धक्कादायक! गेल्या 5 वर्षांत 633 भारतीय विद्यार्थ्यांचा परदेशात मृत्यू; कॅनडा, अमेरिकेत मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक)
मिळालेल्या माहितीनुसार, चाकूने जखमी झालेल्या आठ जणांना नॉर्थ वेस्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे मुलांवर उपचार करण्यात आले. हल्ल्याच्या वेळीस मुलांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. सामुहिक हल्ला करणारा आरोपी 17 वर्षाचा असल्याचे समोर येत आहे. त्याने हे कृत्य का केले असावे याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही. पोलिस या प्रकरणी शोध घेत आहे.
1 little girl killed, 7 injured in mass stabbing at Taylor Swift dance party in Southport, UK#breaking
— Bobby Ellison (@BobbyEllisonKY) July 29, 2024
पंतप्रधान केयर स्टारमर यांनी या घटनेला भयानक आणि अत्यंत धक्कादायक बातमी असल्याचे सांगितले. या घटनेला पोलिस आणि आपत्कालीन सेवांनी जलद प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. परिस्थितीची अपडेट ठेवत जाऊ अशी माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. अनेकांनी या घटनेनंतर चिंता व्यक्त केली. एकाने या संदर्भात माहिती दिली की, आरोपी टॅक्सीतून आला, त्याच्याकडे चाकू होता. मुले जेथे खेळत होती तेथे गेला आणि मुलांवर चाकूने हल्ला केला.