Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

इटलीतील (Italy) कोरोना व्हायरसचे (Coronavirus) लोण झपाट्याने पसरत चालले असून मृतांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. AFP वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, इटलीतील आणखी 627 कोरोना रुग्ण मृत्यूमुखी पडले असून मृतांचा आकडा 4000 हून अधिक झाला आहे. ही खूपच चिंताजनक बाब असून इटलीमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे. आतापर्यंतच्या सर्वेक्षणातून ही आकडेवारी ज्या देशातून हा व्हायरस आला त्या चीनमधील मृतांच्या संख्येपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे.

याआधी कोरोना व्हायरसमुळे इटली (Italy) मध्ये केवळ एका दिवसात 475 लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली होती. त्यात भर म्हणून की काय आजचा म्हणजेच शुक्रवारचा दिवस हा इटलीतील खूपच महत्त्वाचा आणि भयानक असा दिवस ठरला. आज या कोरोना व्हायरसमुळे इटलीत

627 नवीन रुग्णांचा मृत्यू झाला असून इटलीतील मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे. हा आकडा 4000 च्या वर गेल्याचे वृत्त AFP वृत्तसंस्थेने दिला आहे.

AFP news:

हेदेखील वाचा- बिल गेट्स यांच्या 'गेट्स फाउंडेशन'कडून जगभरातील कोरोना व्हायरस रोखण्यासाठी 10 कोटी डॉलर ची आर्थिक मदत जाहीर

यामुळे नागिरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक शहरे बंद करण्याची वेळ आली आहे. हवेमार्फत पसरणाऱ्या या संसर्गजन्य रोगाला थांबवण्यासाठी अनेक युरोपीय देशांनी संपूर्ण शहरेच लॉक डाऊन केली आहे. अनेक सार्वजनिक सेवा बंद करण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. चीनमधील वुहानमधून सुरु झालेला करोनाचा प्रादुर्भाव आता 110 पेक्षा अधिक देशांमध्ये पसरला आहे.