इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या विमानाला अपघात
Israeli PM Benjamin Netanyahu | (Photo Credits: Twitter)

इस्राईल देशाचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Israeli PM Benjamin Netanyahu) यांच्या विमानाला पोलंड (Poland) येथे अपघात झाला. नेतन्याहू यांचे विमान पोलंड यथील वरसॉ विमानतळावरुन (Warsaw Chopin Airport) उड्डाण घेत होते. दरम्यान एका किरकोळ कारणामुळे त्यांच्या विमानाला अपघात घडला. या अपघातातून नेतन्याहू थोडक्यात बचावले. विमानाला अपघात झाल्यानंतर नेतन्याहू यांचा पुढील दौरा रद्द करण्यात आला तसेच, त्यांना वरसॉ येथे एक रात्र मुक्काम करावा लागला.

प्राप्त माहितीनुसार, विमानात नेतन्याहू यांच्यासोबत त्यांच्या पत्नी, चार्टर्ड दलाचे अधिकारी आणि काही जवान प्रवास हायप्रोफाईल सुरक्षेमध्ये प्रवास करत होते. दरम्यान, या अपघातात नेतन्याहू यांच्यासह त्यांचे सर्व सहकारी सुरतक्षीत आहेत. अपघात घडल्यानंतर नेतन्याहू यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी पुढील प्रवास टाळत एक रात्र पोलंडमध्येच थांबण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर इस्राईलवरुन एक खास विमान मागविण्यात आले. या विमानाने पंतप्रधान नेतन्याहू आपल्या सहकाऱ्यांसह मायदेशी रवाना झाल्याचे समजते. (हेही वाचा, ये हुई ना बात! बाळासाहेब विखे पाटील यांची नात नीला विखे पाटील देणार स्वीडनच्या पंतप्रधानांना सल्ला)

या घटनेनंतर नेतन्याहू यांच्या विमानाचे तुकडे झाल्याचे प्रसिद्ध झालेल्या फोटोंमध्ये पहायला मिळाल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. इस्राईल पंतप्रधान नेतन्याहू इथे दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले होते. त्यांच्या सुरक्षेसाठी हायप्रोफाईल यंत्रणा कार्यन्वीत करण्यात आली होती.