उत्तर कोरिया हुकूमशहा किम जोंग उन यांचे निधन? चीन, जपान, अमेरिका या देशांचे रिपोर्ट्स काय म्हणतात? जाणून घ्या
North Korean leader Kim Jong Un | (Photo Credits: Getty images)

उत्तर कोरियाचे (North Korea) हुकूमशाह किम जोंग उन (Kim- Jong-Un) यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून गंभीर आहे. इंटरनेटवर किम यांच्या प्रकृतीबद्दल विविध रिपोट्स पाहायला मिळत आहे. त्याद्वारे किम जोंग उन यांच्या निधनाची माहिती काही रिपोट्सद्वारे समोर येत आहे. इंटरनेटवर असलेल्या किम जोंग यांच्या प्रकृतीविषयी रिपोर्ट्सबद्दल उत्तर कोरियाने कोणतीही पृष्टी केलेली नाही. दरम्यान किम यांच्या अंतयात्रेचे फोटोशॉप केलेले फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

जॅपनिस मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, किम जोंग यांची प्रकृती अधिक चिंताजनक असण्याची शक्यता आहे. चायनीज मीडियाच्या रिपोर्टनुसार, किम जोंगच्या तब्बेतीबद्दल सल्ला देण्यासाठी बिजिंगमधून एक टीम नॉर्थ कोरियात पाठवण्यात आली आहे. मात्र एका चायनीज वृत्तानुसार, किम जोग यांचा मृत्यू झाला आहे. हॉंगकॉंग न्युज चॅनलच्या व्हाईस डिरेक्टर यांनी किम जोंग यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. दरम्यान लेटेस्टलीने या दाव्यांची पडताळणी केलेली नाही. (उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग-उन याच्या प्रकृतीवर संशय कायम, चीनने पाठवली तज्ञ डॉक्टरांची टीम)

या आठवड्याच्या सुरुवातील अमेरिकन मीडियाने असे म्हटले होते की, नॉर्थ कोरियन लीडर यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्या हृदयशस्त्रक्रिया होणार आहे. CNN च्या रिपोर्टनुसार, शस्त्रक्रियेनंतर किम जोंग यांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याची माहिती अमेरिकेला सुत्रांकडून मिळाली आहे. त्या रिपोर्टनुसार, किम यांच्या प्रकृतीबद्दल वेगवेगळे निर्ष्कष निघू लागले. परंतु, दक्षिण  कोरियाने हे सर्व निर्ष्कष फेटाळून लावत किम जोंग यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. (उत्तर कोरिया हुकूमशहा किम जोंग उन यांची प्रकृती गंभीर; सर्जरी नंतर ब्रेन डेड असल्याच्या चर्चा)

या सर्व निर्ष्कषावर उत्तर कोरिया मीडियाने मौन पाळणे पसंत केले आहे. त्यांनी किम जोंग यांच्या प्रकृतीबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. किम जोंग यांना 11 एप्रिल रोजी मीडियासमोर शेवटचे पाहण्यात आले होते. 15 एप्रिल रोजी Kim Il-sung यांच्या 108 व्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात किम जोंग गैरहजर राहिल्यानंतर किम यांच्या निधनाच्या बातम्या पुढे येऊ लागल्या.