उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग-उन याच्या प्रकृतीवर संशय कायम, चीनने पाठवली तज्ञ डॉक्टरांची टीम
किम जोंग-उन, शी जिनपिंग (Photo Credit: Getty)

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग-उन (Kim Jong-un) यांच्या प्रकृतीबद्दल संशय कायम आहेत. किम गंभीर आजारी असून तिची प्रकृती अतिशय नाजूक असल्याचे बोलले जात आहे. किम जोंग यांच्यावर त्याच्या कुटुंबासाठी खास बनवलेल्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे माध्यमांच्या वृत्तानुसार म्हटले जात आहे. दरम्यान, किम जोंगची मदत करण्यासाठी चीनने (China) वैद्यकीय तज्ञांची टीम उत्तर कोरियाकडे (North Korea) पाठविली आहे. अलीकडे असेही वृत्त समोर आले होते की किम जोंग त्यांच्या शस्त्रक्रियेनंतर ब्रेन डेड झाला होता.तथापि, किमच्या प्रकृतीसंदर्भात उत्तर कोरियाकडून अद्याप कोणतीही परिस्थिती स्पष्ट केलेली नाही. अलीकडे, हृदय आबू रक्तवाहिन्या संबंधी आजाराच्या शस्त्रक्रियेनंतर त्याची तब्येत बिघडले असल्याचे वृत्त समोर आले होते. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम अलीकडेच देशात झालेल्या अनेक मोठ्या कार्यक्रमांमध्ये दिसला नाही. 11 एप्रिल रोजी अखेर ते एका बैठकीत हजर झाले. त्यानंतर 15 एप्रिल रोजी त्यांच्या आजोबांच्या जयंती सोहळ्यास ते पोहोचले नाहीत. 2012 नंतर प्रथमच असे आहे की, आजोबांच्या जयंती उत्सवात त्यांनी भाग घेतला नाही. (उत्तर कोरियाचा हुकूमशाह किंम जोंग उन यांच्या निधनाची खोटी बातमी सोशल मीडियात व्हायरल, जाणून घ्या फोटोमागील सत्य)

वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार किम जोंग-उन यांना सल्ला देण्यासाठी ही टीम पाठविली गेली आहे. वृत्तानुसार कम्युनिस्ट पक्षाच्या आंतरराष्ट्रीय लायन्स विभागाच्या वरिष्ठ सदस्याच्या नेतृत्वात ही टीम बीजिंगहून कोरियाला गेली आहे. यापूर्वी दक्षिण कोरियामधील एका सूत्राने सांगितले होते की किम जोंग जिवंत आहेत आणि लवकरच ते लोकांसमोर येतील. किम जोंगची तब्येत ठीक नाही पण याचा अर्थ असा नाही की तो खूप आजारी आहे किंवा तो लोकांसमोर येण्याच्या स्थितीत नाही, असेही सूत्रांनी म्हटले.

सोलच्या वेबसाइट डेली एनकेने सोमवारी नोंदवले की हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रक्रियेपूर्वी 36 वर्षीय किम 12 एप्रिलपासून रुग्णालयात होते.किम जोंग उनचा स्पष्ट वारसदार नसल्याने सध्या त्यांच्याबद्दल अधिक माहिती देखील दिली जात नाही आहे. अशा स्थितीत देशात अस्थिरता आणि एक आंतरराष्ट्रीय धोका देखील उद्भवू शकतो.