किंम जोंग उन याची खोटी बातमी (Photo Credits-Twitter/@Magnnatte)

उत्तर कोरियाचा हुकूमशाह किंम जोंग उन याची प्रकृती गंभीर असल्याच्या चर्चा होत्या. मात्र या संबंधित उत्तर कोरियाकडून या बातमीची कोणत्याही प्रकारे पुष्टी करण्यात आलेली नाही. याच दरम्यान, सोशल मीडियात त्याच्या बाबत आखणी एक बातमी व्हायरल होत आहे. त्यामध्ये असे सांगण्यात येत आहे की, किंम जोंग उन याचा मृत्यू झाला आहे. ही बातमी बीजिंगमधील एका सॅटेलाईट चॅनलच्या माध्यमातून व्हायरल करण्यात आली आहे. परंतु किंम जोंग उन याच्या मृत्यूची बातमी खोटी आहे. सोशल मीडियात जो फोटो व्हायरल करण्यात आला आहे तेथे किंम जोंग उन (Kim Jong Un) याच्या वडिलांचा फोटो लावण्यात आला आहे. खोट्या बातमीत असे ही दाखवण्यात येत आहे की, किंम जोंग उन याचे शव अंतिम संस्कारासाठी घेऊन जात आहेत.

तसेच  किम जोंग उन यांची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जात आहेत. याच पार्श्वभुमीवर चीनमधील डॉक्टरांचे एक पथक उत्तर कोरियाला रवाना झाले असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे किम यांच्या प्रकृतीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत.

सोशल मीडियात व्हायरल झालेले वृत्त:

सोशल मीडियात व्हायरल झालेला फोटो:

किंम जोंग उन याच्या निधनाची बातमी आल्यानंतर त्यासंबंधित लोकांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. लोक ट्वीट करुन प्रश्न उपस्थित करत आहेत. काही लोकांनी व्हायरल करण्यात आलेला फोटो फेक असल्याचे म्हटले आहे. तो फोटो त्याचे दिवंगत वडिलांचा असून त्या जागी किंग जोंग उन याचा फोटो लावण्यात आला आहे.

एका युजर्सने हा फोटो आठ वर्ष जुना असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, किंम जोंग उन याचा जन्म 8 जानेवारी 1983 मध्ये उत्तर कोरियात झाला आहे. किंम जोंग इल यांचा हा पुत्र आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर 2011 पासून उत्तर कोरियाचा हुकूमशाह म्हणून किंम जोंग उन त्याचे नेतृत्व करत आहे.