
Kasganj Shocker: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कासगंज जिल्ह्यात लग्नात पाहुण्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणाबद्दल तक्रार केल्यानंतर वधूच्या काकाने वराच्या (Groom) नातेवाईकाला गोळ्या घातल्याची घटना घडली. या घटनेत त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. वधूच्या काकाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. (Mahakumbh Mela Fire: महाकुंभमध्ये अग्नीतांडव! सेक्टर 8 मध्ये भीषण आग, अग्निशमन दलाची टीम घटनास्थळी दाखल)
कासगंज जिल्ह्यातील घटना
कासगंज जिल्ह्यातील सहावर भागातील रोशन नगर गावात ही घटना घडली. शनिवारी, 15 फेब्रुवारी रोजी रुमाल सिंगच्या घरी लग्नाची मिरवणूक आली होती. अरुण कुमार असे वराचे नाव आहे. वराचे काही नातेवाईक लग्नाला उपस्थित राहण्यासाठी आले होते. लग्नात अर्धवट शिजवलेल्या आणि निकृष्ट दर्जाच्या जेवणाबद्दल त्यांनी मुलीच्या कुटुंबाकडे तक्रार केली. तक्रार ऐकताच, वधूचे काका संतापले आणि अरुण कुमार यांच्यासोबत वाद घातला. त्यांच्या डोक्यात गोळी झाडली.