भारतीय महिलांना एक दिवसाची ब्रिटीश उच्चायुक्त बनण्याची संधी, वाचा सविस्तर
Woman (Photo Credits: File Photo)

जर तुम्ही भारतीय महिला असाल आणि तुमचे वय 18 ते 23 वर्षांच्या मध्ये असेल. तर तुमच्यासाठी एक दिवसाची ब्रिटीश उच्चायुक्त बनण्याची संधी आहे. ही संधी दिलीय ब्रिटीश सरकारने... या विषयी ब्रिटीश उच्चायोगने अशा भारतीय महिलांना खास आमंत्रण दिले आहे ज्यांचे वय 18 ते 23 वर्ष दरम्यान आहे. ब्रिटीश उच्चायोगने जगभरातील भारतीय महिलांना आव्हानांना समोर जाण्यासाठी आणि अधिकार संपन्न बनविण्यासाठी अशा पद्धतीने पुढाकार घेतला आहे. ब्रिटीश उच्चायोगने यावर स्पष्टीकरण देत सांगितले आहे की, विजेतीला वेगवेगळ्या अनुभवांसोबत 'युके-इंडिया' कार्याची विस्तृत शृंखला पाहण्याचीही संधी मिळेल.

या स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्पर्धकांना 'कोविड-19 च्या काळात लैंगिक समानतेसाठी वैश्विक आव्हाने आणि संधी' या विषयावर 1 मिनिटाचा व्हिडिओ रेकॉर्ड करुन अपलोड करायचा आहे.

हेदेखील वाचा- Shinzo Abe Resigns: जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिला PM पदाचा राजीनामा

हा व्हिडिओ तुम्हाला फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर शेअर करावा लागेल. यात सहभागी होण्याची अंतिम तारीख 13 सप्टेंबर 2020 आहे. ब्रिटीश उच्चायोग आंतरराष्ट्रीय बालिका दिवस (11 ऑक्टोबर) साजरा करण्यासाठी 2017 पासून दरवर्षी ही स्पर्धा आयोजित केली जात आहे.