Shinzo Abe | File image | Photo Credits: PTI)

जपानचे PM Shinzo Abe यांनी अखेर पंतप्रधानपदाचा राजीनामा देत असल्याचं आज (28 ऑगस्ट) एका पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केले आहे. त्यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपण हा निर्णय घेत असून आजारपणामुळे देशाचा काराभार पाहणं शक्य होत नसल्याचं म्हटलं आहे. दरम्यान त्यांनी दिलेल्या माहितीमध्ये जुलै महिन्यापासून थकवा जाणवत असल्याने आता आराम करत पूर्ण उपचार घेणं गरजेचे असल्याचं सांगत राजीनामा देत आहे असे म्हटले आहे.

LDP आता जपानचं नेतृत्त्व करणारा पुढील नेता निवडीपर्यंत Shinzo Abe काम करणार आहेत. दरम्यान पुढील मंगळवार पर्यंत नव्या नेतृत्त्वाबदल निर्णय होणार आहे. 65 वर्षीय शिंजो आबे हे डिसेंबर 2012 पासून पंतप्रधान पदी विराजमान आहेत. तर सप्टेंंबर 2021 मध्ये  त्यांंचा कार्यकाळ संपणार होता. कोरोना संकट आणि जपानची आर्थिक घडी पुन्हा बसवण्यासाठी प्रयत्नशील  असणार्‍या शिंजो आबे यांचा अशाप्रकारे राजीनामा हे अनेकांसाठी आश्चर्यकारक वृत्त आहे.

ANI Tweet

2007 साली शिंजो आबे यांना Ulcerative Colitisचं निदान झालं होतं, तेव्हादेखील त्यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा दिला होता. त्यानंतर औषध उपचारांनी त्यांनी आजारपणावर मात करून 2012 साली पुन्हा पदभार स्वीकारला. सोमवारीच शिंजो आबे यांनी आपल्या कार्यालयामध्ये 8 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. दरम्यान जपानमध्ये इतका मोठा काळ पंतप्रधानपदावर राहणारे पीएम बनले आहेत.