Indian Student Missing In US: भारतीय विद्यार्थी अमेरिकेत बेपत्ता; हैदराबाद येथील पालकांना अज्ञाताकडून खंडणीसाठी कॉल
Missing | (Photo credit: archived, edited, representative image)

शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या तरुणाचे हैदराबाद (Hyderabad) येथील पालक हादरुन गेले आहेत. हा तरुण काही काळापासून बेपत्ता (Indian Student Missing In America) असल्याचे वृत्त असतानाच त्याच्या पालकांना अज्ञाताने फोन कॉल करुन खंडणीची मागणी केली आहे. पाठिमागील काही काळापासून या तरुणाशी संपर्क न झाल्याने पालकांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यातच त्यांना 1200 डॉलर्सची रक्कम मिळावी यासाठी अज्ञाताचा फोन आला. तरुणाच्या कुटुंबीयांशी फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने तुमच्या मुलाचे अपहरण झाले आहे. त्याची सूटका हवी असेल तर सांगीतलेली रक्कम द्या. अन्यथा त्याची किडणी विकून पैसे मिळवले जातील, अशी धमकी दिली आहे.

मुळचा हैदराबाद येथील रहिवासी असलेला अब्दुल मोहम्मद हा 25 वर्षांचा तरुण उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेला आहे. हैदराबाद येथे पवीचे शिक्षण घेतल्यानंतर तो इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीचे शिक्षण घेण्यासाठी अहियो येथील क्लिव्हलँड विद्यापीठातत दाखल झाला. त्याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 मार्च रोजी त्याचे आणि कुटुंबीयांशी शेवटचे बोलणे झाले होते. त्यानंतर त्याचा कोणत्याही प्रकारे ई-मेल, फोन अथवा संदेश आला नाही. त्याच्याशी कोणत्याही प्रकारचा संवाद झाला नाही. (हेही वाचा, Indian Student Dead In US: आंध्र प्रदेशातील 20 वर्षीय विद्यार्थ्याचा अमेरिकेत मृत्यू, जंगलात कारमध्ये सापडला मृतदेह; यावर्षातील नववी घटना)

विद्यार्थ्याचे वडील मोहम्मद सलीम यांना पाठिमागच्या आठवड्यात एका अनोळखी फोन क्रमांकावरुन एक कॉल आला. त्या क्रमांकावरील व्यक्तीही त्यांच्यासाठी अनोळखी होता. त्याने मोहम्मद यांना सांगितले की, त्यांच्या मुलाचे क्लिव्हलँड येथील ड्रग्ज तस्करांनी अपहरण केले आहे. त्याची सूटका करायची असेल तर 12,00 डॉलर्स इतकी रक्कम द्या. नाहीतर त्याची किडणी विकून पैसे मिळवले जातील. दरम्यान, सलीम यांनी सांगितले की, समोरील व्यक्तीने पैशांची मागणी तर केली. पण, त्याने पैसे देण्याची कोणती पद्धत मात्र सांगितली नाही. मात्र, तो सातत्याने आम्हाला धमकावत राहिला. (हेही वाचा - Indian Student Found Dead In US: बेपत्ता भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठ कॅम्पसमध्ये आढळला: रिपोर्ट)

खंडणी मागत धमकी देणाऱ्या व्यक्तीचा कॉल आल्यानंतर मोहम्मद सलीम यांनी तातडीने अमेरिकेतील त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. त्यांनी तातडीने अमेरिकी पोलिसांकडे अब्दुल सलीम हा विद्यार्थी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शेवटचे दर्शन झाले तेव्हा अब्दुलने पांढरा टी-शर्ट, लाल जाकीट आणि निळी जीन्स परिधान केली होती, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, त्याच्या कुटुंबीयांनी विद्यार्थ्याचा ठावठिकाणा मिळविण्याबाबत शिकागो येथील भारतीय परिषदेलाही पत्र लिहिले आहे. (हेही वाचा - Indian Student Dies of Cardiac Arrest: कॅनडात 25 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; मुलाचा मृतदेह आणण्यासाठी कुटुंबियांचे परराष्ट्रमंत्र्यांना पत्र)

धक्कादायक म्हणजे अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या एका भारतीय विद्यार्थ्याचा अलिकडेच मृत्यू झाला. त्याच्या एक आठवड्यानंतर लगेचच आणखी एका भारतीय विद्यार्थ्याच्या अपहरणाची नोंद झाली. धक्कादायक असे की, तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत घडलेली ही सलग नववी घटना आहे. अमेरिकेत बोस्टनमधील अभिजीत परुचुरु (20) या अभिजीतचा विद्यार्थ्याचा मृतदेह एका कारमध्ये जंगलात नुकताच सापडला. त्याच्या मृत्यूबाबत अनैसर्गिक घटन घडल्याची शक्यात प्राथमिक तपासादरम्यान स्थानिक पोलिसांनी नाकारली आहे.