Dead Body | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

अमेरिकेतील इंडियाना येथील पर्ड्यू युनिव्हर्सिटीमध्ये (Purdue University) कॉम्प्युटर सायन्स आणि डेटा सायन्स या विषयात दुहेरी विषयात शिक्षण घेत असलेला भारतीय विद्यार्थी (Indian Student) नील आचार्य यांचा दुर्दैवी मृत्यू (Dead) झाला आहे. विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची पुष्टी मंगळवारी (30 जानेवारी) केली. ज्यामुळे त्याच्या कुटुंबीयांसह मित्रपरिवाराला धक्का बसला. नील आचार्य बेपत्ता झाल्याची बातमी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रविवारी (28 जानेवारी) पहिल्यांदा आली. आल्यानंतर त्यांच्या समवयस्क आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये चिंता निर्माण झाली.

विद्यापीठाच्या संगणक विज्ञान विभागाला सोमवारी पाठवलेल्या ईमेलमध्ये, अंतरिम सीएस प्रमुख ख्रिस क्लिफ्टन यांनी आचार्य याच्या निधनाची हृदयद्रावक बातमी दिली. क्लिफ्टनने द एक्सपोनंटने दिलेल्या वृत्तानुसार आचार्य यांचे मित्र, कुटुंब आणि पर्ड्यू समुदायाप्रती शोक व्यक्त केला. ज्यामध्ये क्लिफ्टनने नंतर द एक्सपोनंटला सांगितले की, त्यांना आचार्य यांच्या मृत्यूची पुष्टी डीन ऑफ स्टुडंट्सच्या कार्यालयाकडून मिळाली. मृतदेहाची ओळख आचार्य यांच्या वर्णनाशी जुळली आणि त्यांची वैयक्तिक ओळख समाविष्ट केली. जी पडताळूनसुद्धा पाहिली गेली. (हेही वाचा, Indian Student Found Dead in Italy: इटलीत भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू; मृतदेह आणण्यासाठी कुटुंबीयांनी मागितली सरकारकडे मदत)

विद्यार्थ्याच्या मृत्यूची पुष्टी होण्यापूर्वी आचार्यची आई गौरी आचार्य यांनी 28 जानेवारीपासून बेपत्ता असलेल्या आपल्या मुलाचा शोध घेण्यासाठी सोशल मीडियावर मदत मागितली. तिने त्याचा शेवटचा ठावठिकाणा तपशीलवार सांगितला. त्यांनी आपल्या माहितीमध्ये उबेरने पर्ड्यू विद्यापीठात सोडल्यानंतर बेपत्ता झाल्याबद्दल सांगितले. दरम्यान, शिकागो येथील भारताच्या वाणिज्य दूतावासाने गौरी आचार्य यांच्या विनंतिला प्रतिसाद दिला. त्यांनी पर्ड्यू विद्यापीठाचे अधिकारी आणि आचार्य कुटुंबासह त्यांच्या प्रतिबद्धतेची पुष्टी केली. त्यांनी नील आचार्यला शोधण्याच्या प्रयत्नांना पूर्ण पाठिंबा आणि मदत करण्याचे वचन दिले. (हेही वाचा-India-Maldives row: इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे टूर आणि फ्लाइट ऑपरेटरना मालदीवचे प्रमोशन थांबवण्याचे आवाहन)

आचार्य याचे मित्र आणि रूममेट आर्यन खानोलकर यांने सांगितले की, तो एक प्रेमळ, सर्वांच्या मदतीला धाऊन जाणारा मुलगा होता. तो सर्वांची मिळून मिसळून वागत असे. तो जॉन मार्टिनसन ऑनर्स कॉलेजमध्ये कॉम्प्युटर सायन्स आणि डेटा सायन्समध्ये दोन विषय शिकत होता. क्लिफ्टनने एक्सपोनंटला सांगितले की त्यांना आचार्य याच्या मृत्यूची पुष्टी करणारा डीन ऑफ स्टुडंट्सच्या कार्यालयाकडून ईमेल प्राप्त झाला आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की, एक मृत व्यक्ती सापडला आहे. ज्याची ओळख नीलच्या वर्णनाशी जुळते आहे. शिवाय मृतदेहासोबत नीलचा आयडी होता." रविवारी सकाळी 10:30 च्या सुमारास मॉरिस जे. झुक्रो लॅबोरेटरीजजवळ एक "महाविद्यालयीन तरुण" व्यक्ती मृतावस्थेत आढळला, असेही या ईमेलमध्ये म्हटल्याचे आर्यन खानोलकर याने सांगितले.