Indian Student Found Dead in Italy: झारखंड (Jharkhand) च्या पश्चिम सिंगभूम जिल्ह्यातील एका भारतीय विद्यार्थ्याचा (Indian Student) इटली (Italy) मध्ये अज्ञात कारणांमुळे मृत्यू झाला. राम राऊत असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राऊत हा एमबीएचे शिक्षण घेण्यासाठी इटलीला गेला होता. तेथे तो भाड्याच्या घरात राहत होता. राऊत यांच्या पालकांनी त्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केला असता त्याने फोन उचलला नाही. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. राऊतच्या पालकांनी त्याच्या निवासस्थानाच्या मालकाशी संपर्क साधला. त्यांनी विद्यार्थी घराच्या वॉशरूममध्ये मृतावस्थेत आढळल्याचे सांगितले.
राम राऊतच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर, कुटुंबीयांनी त्यांचे पार्थिव भारतात आणण्यासाठी वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि झारखंडच्या लोकप्रतिनिधींशी संपर्क साधला. या घटनेबाबत बोलताना पश्चिम सिंगभूमच्या उपायुक्त अनन्या मित्तल यांनी सांगितले की, त्यांना राम राऊतच्या मृत्यूची माहिती मिळाली असून आवश्यक कारवाईसाठी त्यांनी गृह विभाग आणि झारखंडच्या स्थलांतर कक्षाला कळवले आहे. (हेही वाचा -Indian-Origin Couple Found Dead in US: अमेरिकेतील आलिशान हवेलीत भारतीय वंशाच्या पतीपत्नीचा मुलीसह गूढ मृत्यू)
मित्तल यांनी सांगितले की, ते या प्रकरणातील सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून असून कुटुंबाच्या संपर्कात आहेत. दरम्यान, मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. कुटुंबीयांनी सांगितले की, नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी 2 जानेवारीला रामला फोन केला होता. मात्र, त्याने फोन उचलला नाही. वारंवार फोन करूनही प्रतिसाद न मिळाल्याने कुटुंबीयांना काहीतरी अनुचित प्रकार झाल्याचा संशय येऊ लागला. (हेही वाचा, Texas Road Accident: टेक्सासमध्ये भीषण रस्ता अपघात, भारतीय वंशाच्या कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू)
शौचालयात आढळला मृतदेह -
अनेकदा फोन करूनही संभाषण होऊ न शकल्याने कुटुंबीयांनी घरमालकाशी मुलाची विचारपूस केली. त्यानंतर तो दुसऱ्या घराच्या बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळून आला. या संदर्भात कॉलेज किंवा भारत सरकारच्या दूतावासाने किंवा परराष्ट्र मंत्रालयाने कोणतीही माहिती दिली नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.