Heart Attack (Photo Credit - pixabay.com)

Indian Student Dies of Cardiac Arrest: हैदराबाद येथील शेख मुझम्मील अहमद (Shaik Muzammil Ahmed) या 25 वर्षीय विद्यार्थ्याचा कॅनडात हृदयविकाराच्या झटक्याने (Cardiac Arrest) मृत्यू झाला. अहमदच्या कुटुंबीयांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना त्यांचे पार्थिव भारतात आणण्यासाठी मदत करण्याची विनंती केली आहे. तेलंगणातील अहमद डिसेंबर 2022 पासून ओंटारियोमधील किचनर सिटीमधील कोनेस्टोगा कॉलेज, वॉटरलू कॅम्पसमधून आयटीमध्ये पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत होता.

गेल्या आठवडाभरापासून त्याला ताप येत होता. शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. अहमदच्या मित्राने फोनवर त्याच्या कुटुंबीयांना मृत्यूची बातमी दिली.(हेही वाचा - Indian-Origin Student Found Dead: भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, यूएसमधील जंगलात सापडला मृतदेह; वर्षभरातील चौथी घटना)

मजलिस बचाओ तहरीक (एमबीटी) या तेलंगणास्थित राजकीय पक्षाचे नेते अमजद उल्लाह खान यांनी सोशल मीडियावर या घटनेची माहिती दिली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर अमजद उल्लाह खान यांनी म्हटलं आहे की, हैदराबाद, तेलंगणा राज्यातील 25 वर्षांचा शेख मुझम्मिल अहमद कोनेस्टोगा कॉलेजमधून आयटीमध्ये मास्टर्स करत होता. कॅनडाच्या ओंटारियोमधील किचनर सिटीमधील वॉटरलू कॅम्पसमध्ये तो शिक्षण घेत होता. गेल्या आठवड्यात त्याला ताप आला होता. मात्र, त्याच्या कुटुंबाला त्याच्या मित्राचा फोन आला की, आज हृदयविकाराच्या झटक्याने अहमदचा मृत्यू झाला. (हेही वाचा, Indian Student Found Dead In US: बेपत्ता भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठ कॅम्पसमध्ये आढळला: रिपोर्ट)

ही बातमी ऐकून अहमदचे आई-वडील आणि संपूर्ण कुटुंब शोकात बुडाले आहे. आपण @HCI_Ottawa आणि @TorontoCGI ला विनंती केली आहे की, त्यांनी अहमदचे पार्थिव लवकरात लवकर हैदराबादला परत पाठवावे. अधिक तपशीलांसाठी कृपया वलीउद्दीन यांच्याशी संपर्क साधा + 1 (647) (786) 5940 किंवा त्याचे काका मोहम्मद अमजद 9618160740 वर संपर्क करा, असं खान यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.