Statue Of Equality (PC - Twitter)

Statue Of Equality: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. भीमराव आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या भारताबाहेरील सर्वात मोठ्या पुतळ्याचे अमेरिकेतील मेरीलँड शहरात औपचारिक अनावरण करण्यात आले. या 19 फूट उंचीच्या स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी (Statue Of Equality) च्या अनावरण सोहळ्याला अमेरिका, भारत आणि इतर देशांतील 500 हून अधिक भारतीय-अमेरिकन लोक उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वांनी जय भीमच्या घोषणा दिल्या. डॉ. भीमराव आंबेडकर यांचा हा 19 फुटांचा पुतळा प्रसिद्ध कलाकार आणि शिल्पकार राम सुतार यांनी तयार केला आहे. राम सुतार यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजेच सरदार पटेल यांचा पुतळा बनवला आहे. गुजरातमधील सरदार सरोवर धरणाच्या खाली नर्मदेच्या बेटावर स्टॅच्यू ऑफ युनिटीची स्थापना करण्यात आली आहे.

पुतळ्याच्या अनावरण समारंभानंतर देशाच्या विविध भागांतील भारतीय-अमेरिकनांनी तेथे विविध सांस्कृतिक सादरीकरणेही केली. त्याचवेळी या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात सहभागी झालेले दिलीप म्हस्के म्हणाले की, स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी 1.4 अब्ज भारतीय आणि 4.5 दशलक्ष भारतीय अमेरिकन लोकांचे प्रतिनिधित्व करेल. दिलीप म्हस्के हे अमेरिकेतील आंबेडकरी चळवळीचे नेतृत्व करतात. (हेही वाचा - France on High Alert: पॅरिसमधील Louvre Museum आणि Palace of Versailles ला बॉम्बची धमकी; लोकांना त्वरित काढले बाहेर, हाय अलर्ट जारी)

स्वतंत्र भारतात डॉ.आंबेडकरांना पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात कायदा व न्याय मंत्री करण्यात आले होते. त्याच वेळी, त्यांनी आपल्या समर्थकांसह 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धर्म स्वीकारला. त्यामुळे शनिवारी अमेरिकेत मेरीलँडमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.