IBM आणि Red Hat (संग्रहित संपादित प्रतिमा)

आयटी कंपनी आयबीएम (IBM) ने तब्बल 34 बिलियन डॉलर्स (2.34 लाख कोटी रुपये) मध्ये सॉफ्टवेअर कंपनी रेड हॅट (Red Hat) विकत घेतली आहे. या दोन्हीही अमेरिकेच्या कंपन्या आहेत. मंगळवारी याबाबत माहिती देताना आयबीएमने सांगितले, त्यांनी रेड हॅट चे अधिग्रहण पूर्ण केले आहे. यामुळे कंपनीचा क्लाउड कंप्युटिंग व्यवसाय वाढण्यास मदत होणार आहे. न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या मते, आईबीएमच्या 108 वर्षांच्या इतिहासात हा त्यांचा सर्वात मोठा सौदा आहे. तर अजून एका अहवालानुसार तंत्रज्ञान क्षेत्रातील हे जगातील तिसरे मोठे अधिग्रहण आहे.

पूर्वी 2016 मध्ये डेल ने 67 अब्ज डॉलर्समध्ये ईएमसी डेटा स्टोरेज खरेदी केले होते. तर 2015 मध्ये 37 अब्ज डॉलर्सच्या डील अंतर्गत अवेगो टेक्नॉलॉजीज ब्रॉडकॉम मध्ये मर्ज झाली होती. रेड हॅट सोबतच्या डीलसाठी आयबीएमला मे मध्ये अमेरिकन रेग्युलेटर्स आणि जून मध्ये युरोपियन युनियनचे रेग्युलेटर्सकडून मंजूरी मिळाली. 1993 मध्ये स्थापित रेड हॅटचे लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम्स खासियत आहे. हे सर्वात लोकप्रिय ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे आणि मायक्रोसॉफ्ट च्या सॉफ्टवेअरचा पर्याय आहे. (हेही वाचा: देशातील सर्वात महागडा जमिनीचा व्यवहार; मुंबई येथील 3 एकर प्लॉटसाठी तब्बल 2 हजार 238 कोटी रुपयांची बोली)

2013 च्या तुलनेत आयबीएमच्या एकूण रेव्हेन्युमध्ये क्लाउड रेव्हेन्यूची भागीदारी आता 25 टक्क्यांनी वाढली आहे. या वर्षाच्या जानेवारी-मार्च तिमाहीच्या शेवटी क्लाउड रेव्हेन्यू 19 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला होता. या डीलनंतर रेड हेट चे सीईओ जिम व्हाईटहर्स्ट आणि त्यांची टीम आयबीएम मध्ये राहतील. जिम यांना आयबीएम च्या वरिष्ठ व्यवस्थापनमध्ये सामील करून घेतले जाणार आहे. याआधी फक्त संगणकाचे हार्डवेअर व सॉफ्टवेअर तयार करणारी आयबीएम आता Cold Storage Services वर मक्तेदारी निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे.