कार्यक्रमात 5 महिलांना Kiss केल्यानंतर राष्ट्रपतींची धक्कादायक कबुली; मी समलैंगिक होतो, स्त्रियांच्या चुंबनाने झाला बदल (Video)
Philippines President Kiss (संग्रहित-संपादित प्रतिमा)

याआधी एका विवाहित महिलेचे चुंबन घेऊन प्रकाशझोतात आलेले फिलिपीन्सचे (Philippines) राष्ट्रपती, पुन्हा एकदा अशाच विवादात अडकले आहेत. रॉड्रिगो ड्युतेर्ते (Rodrigo Duterte) असे या राष्ट्रपतींचे नाव असून, त्यांनी भाषणानंतर स्टेजवरच पाच महिलांचे चुंबन घेतले आहे. महत्वाचे म्हणजे आपण आधी समलैंगिक म्हणजेच गे (Gay) होतो, मात्र सुंदर महिलांचे चुंबन घेतल्याने आपणात बदल झाला असे असे रॉड्रिगो यांनी सांगितले. त्यांची घटस्फोटीत पत्नी एलिजाबेथ जिमरमॅनला भेटल्यानंतर त्यांनी स्वतःला गे वरून स्ट्रेट बनवले.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, 74 वर्षीय रॉड्रिगो जपान दौऱ्यावर आले होते. जपान मध्ये फिलिपिनो समुदायाच्या लोकांना ते भेटले. त्यावेळी कार्यक्रमाच्या शेवटी भाषणानंतर त्यांनी स्टेजजवळील एका महिलेला वर बोलावून घेऊन स्वतःला किस करायला सांगितले. तिने राष्ट्रपतींना विचारले की, कुठे किस करायचे आहे? त्यानंतर महिलेने त्यांच्या गालाला गाल लावून किस केले. त्यानंतर एकूण चार महिला स्टेजवर आल्या व त्यांनी या राष्ट्रपतींना किस केले. (हेही वाचा: भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच या लोकप्रिय महिला खेळाडूने दिली लेस्बियन असल्याची कबुली)

या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर, रॉड्रिगो यांनी आधी ते समलैंगिक असल्याची कबुली दिली व महिलांच्या चुंबनानेच ते त्यातून बाहेर पडले. यापूर्वी जून 2018 मध्ये त्यांनी दक्षिण कोरियामध्ये एका विवाहित महिलेला ओठांवर किस केले होते.