नेपाळ येथे हेलिकॉप्टर कोसळून, पर्यटन मंत्र्यांसह सहा जण ठार
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

नेपाळचे पर्यटन, संस्कृती आणि नागरी उड्डाण मंत्री रविंद्र अधिकारी (Rabindra Adhikari) यांच्या समवेत इतर पाच जणांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर बुधवारी दुपारी क्रॅश झाले. या अपघातात पर्यटन मंत्र्यांसह सर्व जण मृत्युमुखी पडले आहेत. गृहमंत्रालयाचे सचिव प्रेम कुमार यांनी या वृत्ताची पुष्टी दिली आहे. पूर्वी नेपाळच्या तेहरथम (Tehrathum) जिल्ह्यात हा अपघात घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अन्य अधिकाऱ्यांसह पर्यटन मंत्री पथीभरा मंदिराला (Pathibhara Temple) भेट देण्याच्या मार्गावर होते आणि नंतर चुहान दंडाच्या (Chuhan Dand) विमानतळाचे अंतर्गत बांधकाम प्रकल्पाचे चालू कार्य पहाण्यासाठी पंचथला (Panchthar) पोहचणार होते. (हेही वाचा: 200,500 आणि 2000 रुपयाच्या भारतीय नोटांना नेपाळमध्ये चलनात मान्यता मिळावी यासाठी RBI कडे The Nepal Rastra Bank ची पत्राद्वारा मागणी)

ही घटना समजताच अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, पंतप्रधान कार्यालय आणि मंत्री परिषदेने बलुवतर येथील पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी आपातकालीन बैठक बोलावली आहे. हा अपघात कसा झाला, नक्की अपघातच होता की आणखी काही यासंदर्भात अद्याप माहिती हाती आलेली नाही.