पाकिस्तानचे माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी (Former Pakistan Prime Minister Yousuf Raza Gilani) यांची कोरोना चाचणी (COVID19 Tests) पॉझिटिव्ह (Positive) आली आहे. यासंदर्भात पाकिस्तान मेडियाने वृत्त प्रकाशित केलं आहे. विशेष म्हणजे मागील आठवड्यात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद खकान अब्बासी (Shahid Khaqan Abbasi) यांनादेखील कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.
शाहिद अब्बासी यांची 9 जून रोजी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर आज युसूफ गिलानी यांना कोरोनाची बाधा झाली आहे. एकाच आठवड्यात दोन माजी पंतप्रधानांना कोरोनाची लागण झाल्याने पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. गिलानी यांना नॅशनल अकाऊंटेबिलिटी ब्यूरो म्हणजेच नॅबमुळे कोरोनाची लागण झाली आहे, असा गंभीर आरोप गिलानी यांच्या मुलाने केला आहे. विशेष म्हणजे नॅबमध्ये गिलानी आणि अब्बासी या दोघांविरोधात भ्रष्टाचाराची चौकशी सुरू आहे. त्यामुळे या दोघांना नॅबमध्ये अनेकदा चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. (हेही वाचा - Coronavirus Updates: जगभरात कोरोना व्हायरसच्या संक्रमितांचा आकडा 76 लाखांच्या पार तर 425,000 हून अधिक लोकांचा COVID19 मुळे बळी- जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी)
Former Pakistan Prime Minister Yousuf Raza Gilani tests positive for #COVID19: Pakistan Media (file pic) pic.twitter.com/ftq0g7gFKj
— ANI (@ANI) June 13, 2020
दरम्यान, पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदी यालादेखील कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. याबाबत आफ्रिदीने स्वतःच ट्विट करून माहिती दिली आहे. शाहीद आफ्रिदीने आपल्या चाहत्यांना स्वत: साठी प्रार्थना करण्याची विनंती केली आहे.