Dubai Floods Video: दुबईमध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती, शाळा, ऑफिस बंद
Flood | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Dubai Floods Video: संयुक्त अरब अमिरातीची (UAE) राजधानी दुबईमध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. मुसळधार पावसामुळे विमानतळ, मेट्रो स्टेशन आणि रस्त्यांवर पाणी साचले होते. दुबईत मुसळधार पावसामुळे घरे आणि मॉलमध्येही  पाणी साचले होते. मुसळधार पावसामुळे दुबईतील शाळा आणि महाविद्यालये पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुबईत मुसळधार पावसामुळे कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कारण मेट्रो स्टेशनसह रस्ते पाण्याने भरले आहेत. त्यामुळे लोकांना एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी ये-जा करताना प्रचंड त्रास होत आहे.

पाहा पोस्ट:

सोमवारी रात्री उशिरापासून मंगळवारी सकाळपर्यंत मुसळधार पाऊस झाला. अवघ्या एका दिवसाच्या पावसाने संपूर्ण दुबई जलमय झाली. पुढील ४८ तासांत दुबई, अबुधाबी आणि शारजाहमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची भीती राष्ट्रीय हवामान केंद्राने व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत लोकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.

ओमानमध्ये पावसामुळे १८ जणांचा मृत्यू

दुबईत मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. ओमानमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला असून दोन जण अद्याप बेपत्ता आहेत.