Diana Carnero Shot Dead (PC- X/ @EmergenciasEc)

Ecuador Lawmaker Diana Carnero Shot Dead: दक्षिण अमेरिकन देश इक्वेडोर (Ecuador) मध्ये एका तरुण महिला नेत्याची तिच्या भागातील खराब रस्त्यांचा व्हिडिओ बनवत असताना गोळ्या झाडून हत्या (Murder) करण्यात आली. या घटनेनंतर इक्वेडोरमध्ये शोककळा पसरली असून एका तरुण नेत्याची भरदिवसा हत्या झाल्याबद्दल लोकांनी संताप व्यक्त केला आहे.

व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना करताना करण्यात आला हल्ला -

इक्वेडोरच्या नगरसेवक डायना कार्नेरो (Diana Carnero) (वय, 29) यांच्यावर गुयास नारंजल भागातील खराब रस्त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असताना हल्ला करण्यात आला. मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी डायनाच्या डोक्यात गोळी झाडली आणि घटनास्थळावरून पळ काढला. सर्व काही इतक्या झपाट्याने घडले की लोक फक्त पाहत राहिले. या घटनेनंतर डायनाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिस हल्लेखोरांची ओळख पटवत असून त्यांचा शोध घेत आहेत. (हेही वाचा -VIDEO- Abhishek Ghosalkar Shot Dead: शिवसेना यूबीटी नेते अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या; नंतर आरोपी मॉरिस भाईने स्वतःलाही संपवले (Watch))

इक्वेडोरचे माजी अध्यक्ष राफेल कोरिया यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून डायनाच्या हत्येबद्दल दु:ख व्यक्त केले. त्यांनी लिहिले, 'डायना फक्त 29 वर्षांची होती. या वयाची मुलं जेव्हा हे जग सोडून जातात तेव्हा पालकांचे काय होईल, हे एक भयानक स्वप्न आहे. मारेकऱ्यांनी एका प्रतिभावान नेत्याचे जीवन संपवले. हे किती लज्जास्पद आहे.'

दरम्यान, ग्वायाकिलच्या उपमहापौर ब्लँका लोपेझ यांनी सोशल मीडियावर लिहिले, 'हे सर्व संपले पाहिजे. आपल्या प्रदेशाच्या, प्रांताच्या आणि देशाच्या भल्यासाठी कोणाचाही जीव धोक्यात येऊ नये.' इक्वेडोर सध्या गंभीर सुरक्षा संकटाचा सामना करत आहे.