VIDEO- Abhishek Ghosalkar Shot Dead: शिवसेना यूबीटी नेते अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या; नंतर आरोपी मॉरिस भाईने स्वतःलाही संपवले (Watch)
मॉरिस भाई असे आरोपीचे नाव असून अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर त्याने स्वतःवरही गोळ्या झाडल्या. मॉरिस भाईने आधी अभिषेकयांच्यासोबत फेसबुक लाईव्ह केले आणि नंतर गोळ्या झाडल्या.
Abhishek Ghosalkar Shot Dead: मुंबईमध्ये गुरुवारी (8 फेब्रुवारी) सायंकाळी दहिसर परिसरात उद्धव ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्या गेल्या, ज्यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर आता रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. मुंबई पोलिसांनी अभिषेक यांच्या मृत्यूला दुजोरा दिला. मॉरिस भाई असे आरोपीचे नाव असून अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर त्याने स्वतःवरही गोळ्या झाडल्या. मॉरिस भाईने आधी अभिषेकयांच्यासोबत फेसबुक लाईव्ह केले आणि नंतर गोळ्या झाडल्या. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. विनोद घोसाळकर हे उद्धव ठाकरे गटाचे नेते असून अभिषेक घोसाळकर हे त्यांचे पुत्र आहेत. अभिषेक घोसाळकर हे माजी नगरसेवक होते. गँगस्टर मॉरिस हा बोरिवली पश्चिम येथील आयसी कॉलनीमधील रहिवासी होता. त्याच्यावर बलात्कार, खंडणी व फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. (हेही वाचा; Money Laundering Case: कार डिझायनर दिलीप छाब्रिया आणि कुटुंबाकडून तब्बल 18 कोटींचे लाँडरिंग- ED)
मुम्बई में उद्धव ठाकरे ग्रुप के नेता अभिषेक घोसालकर पर फायरिंग
मुम्बई के जोन 11 कांदिवली की घटना,
जख़्मी घोसालकर करुणा अस्पताल में है भर्ती,
अभिषेक के पिता विनोद घोंसलकर उद्धव के बेहद करीबी है और पूर्व विधायक राह चुके है
घोसालकर परिवार का दहिसर से लेकर कांदिवली इलाके तक है, pic.twitter.com/Js3pJixFxD
— Krishna Kant Mishra (@KKMishraOffice) February 8, 2024
तीन गोळ्या थेट शरिरात घुसल्याने ठाकरे गटाच्या अभिषेक घोसाळकरांचा मृत्यू, मॉरिन नोरवाने स्वतःलाही संपवलंhttps://t.co/QstG95TrnN#AbhishekGhosalkar #Shivsena #UddhavThackeray #mumbai
— ABP माझा (@abpmajhatv) February 8, 2024
शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची आज गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना अत्यंत धक्कादायक असून राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारी आहे.
अभिषेकच्या अकाली जाण्याने विनोद घोसाळकर व त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून ईश्वर त्यांना…
— Balasaheb Thorat (@bb_thorat) February 8, 2024
गुन्हेगारांची पाठ थोपटतंय तरी कोण? कोणाचं पाठबळ मिळतंय यांना की कायद्याचा जरा ही धाक राहिलेला नाही? महाराष्ट्रात जे घडत आहे ते अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक आहे.
आज मुंबईत माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विनोद घोसाळकर यांचे पुत्र अभिषेक घोसाळकर यांच्यावर फेसबुक लाईव्हवर… pic.twitter.com/gHx0nHfgqm
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) February 8, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 08, 2024 10:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

