Earthquake in Pakistan: पाकिस्तानची राजधानी भूकंपाच्या धक्क्याने हादरली; इस्लामाबादमध्ये 4.7 तीव्रतेचा भूकंप
Earthquake | (Image Credit - ANI Twitter)

Earthquake in Pakistan: पाकिस्तान (Pakistan) ची राजधानी इस्लामाबाद (Islamabad) सह अनेक भागात बुधवारी 4.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप (Earthquake) जाणवला. मात्र, अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. नॅशनल सिस्मॉलॉजिकल मॉनिटरिंग सेंटरच्या म्हणण्यानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानच्या दक्षिण-पूर्व भागात होता. इस्लामाबाद, रावळपिंडी, पेशावर, स्वात, मलाकंद, उत्तर वझिरीस्तान, पाराचिनारसह 98 किलोमीटर खोलीवर भूकंपाचे धक्के जाणवले.

पाकिस्तानमध्ये वारंवार भूकंप होतात. कारण, हा देश भारतीय आणि युरेशियन टेक्टोनिक प्लेट्सच्या सीमेवर आहे. भारतीय टेक्टोनिक प्लेट उत्तरेकडे युरेशियन प्लेटमध्ये सरकल्यामुळे दक्षिण आशियाचे मोठे भाग भूकंपाच्या दृष्टीने सक्रिय आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला कराचीच्या काही भागात 3.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. (हेही वाचा -Earthquake in Afghanistan: अफगाणिस्तानमध्ये 4.5 तीव्रतेचा भुकंप, कोणतीही जीवितहानी नाही)

दरम्यान, 2 मे रोजी 2.3 रिश्टर स्केलच्या भूकंपाने गडप टाउन, कटोहर आणि मालीर जिल्ह्यातील लगतच्या भागांसह महानगरातील काही भाग हादरले. 13 मार्च रोजी पंजाब आणि खैबर-पख्तुनख्वा प्रांतातील विविध भागांना 5.3 तीव्रतेच्या भूकंपाने हादरले. 2005 मध्ये पाकिस्तानमध्ये 7.4 रिश्टर स्केलच्या भूकंपात 74,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.