Earthquake in China and Myanmar : चीनसह म्यानमारमध्ये भूकंपाचे धक्के; 4.2 रिश्टर स्केलची तीव्रता
Earthquake | (Image Credit - ANI Twitter)

Earthquake in China and Myanmar : नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) च्या आकडेवारीनुसार रविवारी चीन(China)च्या झिझांगमध्ये 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंप (Earthquake) चा धक्का बसला. भूकंपाचा केंद्रबिंदू अक्षांश 28.28 आणि रेखांश 87.87, 30 किलोमीटर खोलीवर होता. रविवारी म्यानमार (Myanmar) मध्ये रिश्टर स्केलवर 4.2 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. (हेही वाचा :Earthquake in Indonesia: इंडोनेशियात ६.५ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के; समुद्रात महाकाय लाटा निर्माण )

नायपीडाव हे भूकंपाचे केंद्रबिंदू होते. भूकंपाचा केंद्रबिंदू अक्षांश 25.39 आणि रेखांश 96.06 येथे 7 किलोमीटर खोलीवर होता. येथेही कोणती जीवितहानी झाली नाही.

दरम्यान, रविवारी इंडोनेशियात भूकंपाचे धक्के जाणवले. इंडोनेशियाच्या पश्चिम जावा प्रांतात शनिवारी रात्री ६.५ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. ज्यामुळे समुद्रात महाकाय लाटा निर्माण झाल्या होत्या. त्याबाबतची माहिती हवामानशास्त्र संस्थांनी दिली