डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो (DRC) या मध्य आफ्रिकेतील देशामध्ये पुलाचे उद्घाटन करण्यासाठी एक महिला अधिकारी आल्या. त्या उद्घाटनाची रिबन कापणार इतक्यात पूलच (Bridge Collapse) कोसळला. त्यामुळे सोशल मीडियावर चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे. घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. पावसाळ्यात स्थानिक नागरिकांना नदी ओलांडण्यासाठी अडचण होत असल्याने हा एक अरुंद पूल बांधण्यात आला होता. हा पुल तात्पूरत्या स्वरुपाचा होता. अर्थात हा पूल तात्पूरत्या स्वरुपाचा असला तरी तो उद्घाटनावेळीच कोसळावा इतक्या तात्पूरता स्वरुपाचा असेल अशी कोणी कल्पना देखील केली नसेल. या प्रकारामुळे स्थानिक प्रशासन आणि पुल बांधणाऱ्या अभियंत्याची सोशल मीडियावर चांगलीच खरडपट्टी काढली जात आहे.
आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कार्यक्रमादरम्यान डीआरसी अधिकार्यांच्या गटाने अरुंद पूलावर प्रवेश केला. पुलाच्या उद्घाटनासाठी पुलाच्या शेवटच्या टोकाला रुळांवर एक लाल रिबन बांधली होती आणि सरकारचा एक अधिकारी कात्रीने तो कापण्यासाठी तयार होता. पूल अगदीच अरुंद होता. एका वेळी सोबत दोन किंवा तीन लोकच या पूलावरुन चालू शकतील इतका. (हेही वाचा, Desi Jugaad: 'साबणाचे फुगे' उडाले जेव्हा देसी जुगाड जमले, पाहा व्हायरल व्हिडोओ)
अधिकारी पूलाच्या उद्घाटनासाठी हातात कात्री घेऊन त्या रिबीनजवळ गेला. परंतू, हा पूल उपस्थितांचा भार पेलू शकला नाही परिणामी रिबिन कापतानाच पूल कोसळला. ज्यामुळे पूलावरील महिला अधिकारी आणि उपस्थिततही पुलासोबत खाली कोसळले.
व्हिडिओ
उद्घाटनावेळी घडलेल्या चित्रविचीत्र घडामोडींनी आफ्रिकन राजकारणी नेहमीच चर्चेचा विषय ठरलेले असतात. त्यांच्या या मजेदार गोष्टी सोशल मीडियावरही अनेकदा व्हायरल झालेल्या असतात. DRC आणि अफगाणिस्तान हे दोन्ही गरीब देश असताना, पूर्वीचे देश अधिक वेगळे आहेत कारण, आर्थिक अडचणी असूनही, ते बाहेरील मदतीवर कमी अवलंबून आहेत.