Desi Jugaad Soap Bubbles | (Photo Credit: Tweet)

'साबणाचे फुगे' (Soap Bubbles) आणि लहानपण याचे एक अतूट नाते. प्रत्येक लहानग्याला साबणाचे फुगे प्रचंड आवडतात. त्यासाठी साबणाचे पाणी करुन त्याचा फेस करणे आणि त्याचे फुगे (Bubbles) करुन हवेत उडवणे हा कितीतरी आनंददायी अनुभव. प्रत्येकाला हवाहवासाच. असाच हा आनंद कोणत्याही कष्टाशिवाय मिळविण्यासाठी एका पठ्ठाने चांगलीच शक्कल लढवली. शक्कल कसली याला आपण थेट देसी जुगाड असेही म्हणू शकतो. या देसी जुगाडाचा व्हिडिओ (Viral Videos) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. आपणही येथे हा व्हिडिओ पाहू शकता. कदाचित त्यातून तुम्हालाही एखादी नवी कल्पना सूचू शकते बरं.

तानसु येगेन (Tansu Yegen) यांनी आपल्या ट्वीटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत आपण पाहू शकतो की, घरातील पंख्याच्या सहाय्याने फुगे उडविण्यासाठी खास यंत्रणा राबविण्यात आली आहे. गॅझेटचे निर्मात्याने एक खास कॉम्पॅक्टच्या माध्यमातून अशी काही शक्कल लढविल्याचे आपण व्हिडिओत पाहू शकतो की, ज्यामुळे कल्पनाशक्तीला आपोआपच दाद द्यावी असे वाटते.

अवघ्या 56 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एक टेबल फॅन एका खुर्चीसारख्या वस्तूवर ठेवण्यात आली आहे. एक भक्कम आधार घेऊन त्याला दोन क्लिपच्या सहाय्याने एक काठी बांधण्यात आली आहे. ज्यामुळे एका हँगरच्या सहाय्याने फरशीवर ठेवलेल्या डब्यातील साबणाचे पाणी त्याकाठीच्या सहाय्याने पंख्याच्या हवेच्या रेशेत येते. पंखा सुरु झाला की आपोआपच हे फुगे मोठ्या प्रमाणावर हेच्या झोताबरोबर उडू लागतात. महत्त्वाचे म्हणजे हे साबणाचे फुगे उडविण्यासाठी तुम्हाला काहीच करावे लागत नाही. तुम्हाला फक्त ही यंत्रणा (देसी जुगाड) कार्यन्वीत करुन मजा घ्यायची आहे.

ट्विट

ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 4.5 लाखांहून अधिक व्ह्यूव्ज मिलाले आहेत. तर 15,000 पेक्षाही अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. एका ट्विटर युजरने म्हटले आहे की, मला फार चांगले वाटते जेव्हा इंजिनीअर कंटाळतात. तेव्हाच ते एखादी चांगली गोष्ट निर्माण करतात. जी त्यांच्या डीग्रीपेक्षा अगदीच वेगळी असते.