अमेरिका: डेमोक्रेट पक्षाचे माजी खासदार ओरॉरके लढणार राष्ट्राध्यक्ष पद निवडणूक
Beto-ORourke | (Photo Credit-Getty Images)

अमेरिकेतील टेक्सास राज्यातील डेमोक्रेट पक्षाचे माजी खासदार ओरॉरके (Beto O'Rourke) 2020 मध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत (Presidential Election) उतरणार आहेत. ओरॉरके यांनी त्याबाबतचे ट्विटही गुरुवारी केले. 'मी आपील सेवा करण्यासाठी आगामी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत सहभागी होणार आहे', असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. अमेरिका सध्या ज्या समस्यांचा सामना करत आहे. त्या समस्या आमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या समस्या असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

वृत्तसंस्था सिन्हुआच्या वृत्तानुसार, ओरॉरके यांनी ट्विटसोबत एक व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओत हा 46 वर्षीय नेता सांगतो की, अमेरिकेसाठी मी एक सकारात्मक अभियान चालवणार आहे. ज्यातून जनतेचा प्रतिसाद मिळू शकेल. या अभियानाच्या माध्यमातून आम्ही नागरिकांना एकत्र आणू शकतो, आशादावाही त्यांनी केला आहे. (हेही वाचा, न्यूझीलंड: क्राइस्टचर्च येथील 2 मस्जिदमधील गोळीबारात बांग्लादेश क्रिकेट संघ सुदैवाने बचावला)

मेक्सिकोच्या सीमेलगत असलेल्या टेक्सास शहर अल पासोच्या नगर परिषद सदस्याच्या रुपात ओरॉरके यांनी राजकारण आणि समाजकारणात पाऊल टाकले आहे. त्यांनी म्हटले की, अमेरिकेच्या नागरिकांनी या सत्याचा स्वीकार करायला हवा की, जगभरातून होणारे Immigration हे अमेरिकेसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. भविष्यात या मोठ्या आव्हानाचा सामना अमेरिकेला करावा लागणार आहे, असेही ओरॉरके यांनी म्हटले आहे.