US: अखेर Donald Trump यांनी स्वीकारला राष्ट्रपती निवडणुकीचा पराभव; Joe Biden यांच्याकडे सत्ता हस्तांतरण करण्यास दिली मान्यता
Donald Trump, Joe Biden | (Photo Credits: YouTube Screengrab)

अमेरिकेत नुकत्याच राष्ट्रपती निवडणुका (US Presidential Election) झाल्या. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्याचवेळी जो बिडेन (Joe Biden) यांची अमेरिकेचे नवे राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. मात्र निवडणुकीनंतरही डोनाल्ड ट्रम्प अद्याप आपला पराभव स्वीकारायला व आपली हार मानायला तयार नव्हते. परंतु आता अमेरिकेत सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू करण्यास डोनाल्ड ट्रम्प यांनी मान्यता दिली आहे. अशाप्रकारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर अध्यक्षपद आणि व्हाइट हाऊस सोडण्याचे संकेत दिले आहेत.

सोमवारी, पुढील राष्ट्रपती जो बिडेन यांच्या कारभाराचा मार्ग मोकळा करणार्‍या सरकारी एजन्सीने म्हटले आहे की, अखेर सत्ता हस्तांतरणावरील निर्बंध हटविला जात आहे. यानंतर ट्रम्प यांनीही आता जनरल सर्व्हिसेस प्रशासनाने 'जे करणे आवश्यक आहे ते करावे' असे संकेत दिले. अशा प्रकारे ट्रंप यांनी जो बिडेन यांच्याकडून झालेला पराभव स्वीकारला आहे.

अमेरिकेच्या निवडणुकीला तीन ते चार आठवड्यांच्या कालावधी उलटूनही असा विश्वास होता की डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीचे निकाल पालटू शकतात. निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बिडेन आणि त्यांच्या डेमोक्रॅटिक पक्षावर अनेक वेळा निशाणा साधला आहे. डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीच्या निकालानंतर आपली हार मानण्यास तयार नव्हते. यासाठी त्यांनी निकालाला कायदेशीररीत्या आव्हान देण्याच्या रणनीतीवरही काम केले, परंतु ते पूर्णत्वास गेले नाही. अशा परिस्थितीत डोनाल्ड ट्रम्प यांनी आता आपला पराभव स्वीकारला आहे. त्याचबरोबर मतदारांच्या मदतीने आपला पराभव विजयाकडे वळवू शकतो असा दावाही त्यांनी केला आहे. (हेही वाचा: America: ट्विटर नंतर Facebook सुद्धा जो बिडेन यांना देणार राष्ट्राध्यक्ष पदाचे अधिकृत अकाउंट)

आता अमेरिकेच्या जनरल सर्व्हिस अ‍ॅडमिनिस्ट्रेटर एमिली मर्फी यांनी जो बिडेन यांना पत्र लिहून सत्ता हस्तांतरणाच्या प्रक्रियेत सामील होण्यासाठी आमंत्रित केले आहे. जो बिडेनच्या समर्थकांनी सत्ता हस्तांतरण सुरू झाल्याचे स्वागत केले आहे. जो बिडेन आता 20 जानेवारी रोजी शपथ घेण्याची तयारी करत आहेत. मात्र  ट्रम्प यांच्या मोहिमेनुसार अजूनही ते मिशिगनच्या निवडणुकीच्या निकालाला आव्हान देतील, असे म्हणत आहे मात्र यासाठीचा वेळ हळूहळू संपत आहे. 14 डिसेंबर रोजी अमेरिकन इलेक्टोरल कॉलेज बिडेन यांच्या विजयाची पुष्टी करेल.