America: ट्विटर नंतर Facebook सुद्धा जो बिडेन यांना देणार राष्ट्राध्यक्ष पदाचे अधिकृत अकाउंट
Joe Biden | (Photo Credits: Facebook)

America:  ट्विटरनंतर (Twitter) आता फेसबुक (Facebook) सुद्धा त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर अधिकृत पीओटीयुएस (POTUS) अकाउंट नव नियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बिडेन (Joe Biden)  यांना देणार आहे. फेसबुक 20 जानेवारीला जो बिडेन यांची राष्ट्राध्यक्ष पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर त्यांना अधिकृत अकाउंट देणार आहे. ट्विटरने शुक्रवारी असे म्हटले होते की, ज्या दिवशी जो बिडेन राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतील त्याच दिवशी पीओटीयुएस अकाउंट त्यांना दिले जाणार आहे. फेसबुकने शनिवारी अशाच पद्धतीची घोषणा केली आहे.(Jerusalem Municipality offers Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांना येरुशलम महानगरपालिकेची ऑफर, 'काळजी करु नका आमच्याकडे या')

द वर्ज यांच्या रिपोर्टनुसार, कंपनीने त्यांच्या विधानात म्हटले की 2017 मध्ये आम्ही ओबामा सरकार आणि येणाऱ्या ट्रंम्प प्रशासनासोबत काम केले आहे. हे निश्चित केले की 20 जानेवारी दिवशी फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंट ट्रान्सफर केले जाणार आहे. आम्ही सुद्धा हिच अपेक्षा करत आहोत.(US Presidential Election 2020: डेमोक्रॅटीक पक्षाचे Joe Biden असणार अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष; 20 जानेवारी 2021 ला स्विकारणार पदभार)

ट्विटर नुसार, त्यांच्या अकाउंटवर सध्याचे ट्विटस संग्रहित केले जाणार आहेत. तर ट्विटर अकाउंटवर बिडेन यांचे कोणतेही ट्विट नसणार असून ते तशाच पद्धतीने दिले जाणार आहे. बिडेन यांच्या शपथविधी नंतर ट्रंम्प आपल्या व्यक्तिगत अकाउंटचा वापर कायम ठेवू शकणार आहेत. पुढील वर्षात 20 जानेवारी ट्रंम्प ट्विटरवर आपला विशेषाधिकार गमावणार आहेत. त्यांचे ट्विट हे एका सामान्य युजर्ससारखे मानले जाणार आहे. मात्र फेसबुककडून ट्रंम्प यांच्या विशेषाधिकाराबद्दल काही म्हटलेले नाही.