Jerusalem Municipality offers Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांना येरुशलम महानगरपालिकेची ऑफर, 'काळजी करु नका आमच्याकडे या'
Donald Trump | (Photo Credits: Facebook)

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्यावर डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आता काय करणार हा प्रश्न सहाजिकच अनेकांच्या मनात आला असेल. डोनाल्ड ट्रम्प यांनीही याबाबत अद्याप काही स्पष्टता दिली नाही. परंतू, ड्रम्प यांच्याकडे आता बराचसा वेळ असेल असे गृहीत धरुन यरुशलम महानगरपालिकेने (Jerusalem Municipality) भलतेच धाडस दाखवले आहे. यरुशलम महानगरपालिकेने ट्रम्प यांना ऑफर देत म्हटले आहे की, काळजी करु नका. आमच्याकडे खूप जागा आहेत. तुम्ही आमच्यासोबत काम करा. दरम्यान, अत्यंत अटीतटीच्या आणि उत्कंटावर्धक अशा झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डेमेक्रॉटीक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांच्याकडून डोनाल्ड ट्रम्प यांना पराभव स्वीकारालावा लागला. सुरुवातीला डोनाल्ड ट्रम्प हेच पुन्हा निवडूण येतील असे मानले जात होते. मात्र, बिडेन यांनी जनमत तयार केले आणि परीवर्तन घडले.

आपल्या ऑफरमध्ये येरुशलम महानरपालिका (Jerusalem Municipality) म्हणते की, आमच्याकडे अशी अनेक पदं रिक्त आहेत. ज्या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प हे काम करण्यास अगदी योग्य उमेदवार आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तामध्ये या ऑफरबाब उल्लेख आहे.

यरुशलेम महानगरपालिकेच्या फेसबुक पेजवर जॉब बोर्डची लिंक शेअर करण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, 'डोनाल्ड जे ट्रम्प, आपल्याला चिंता करण्याचे कारण नाही. आमचे यरुशलम जॉब बोर्ड प्रतिदिन नव्या ऑफरसह अपडेट करण्यात आले आहे.' (हेही वाचा, US Presidential Election 2020: डेमोक्रॅटीक पक्षाचे Joe Biden असणार अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष; 20 जानेवारी 2021 ला स्विकारणार पदभार)

वृत्तपत्र यरुशलम पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, ही पोस्ट महानगर पालिकेच्या फेसबुक पेजवरुन तत्काळ हटविण्यात आली आहे. तसेच, महानगरपालिकेच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, ही पोस्ट नजरचुकीने शेअर करण्यात आली होती. जी आता तातडीने हटविण्यात आली आहे.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या 70 वर्षांमध्ये चालत आलेल्या परराष्ट्र धोरणात बदल करत यरुशलमला इस्त्राईलची राजधानी म्हणून मान्यता दिली होती. ही मान्यता त्यांनी 2017 मध्ये दिली.