जगातील असे अनेक देश आहेत जिथे समलिंगी सबंधांसाठी (Same Sex Relationship) कायद्याने मान्यता दिली आहे. असाच एक देश म्हणजे इंग्लंड (England). तर ब्रिटनमध्ये समलिंगी जोडप्याचे (Gay Couple) एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. समलिंगी जोडप्याच्या सरोगेट मुलीचा प्रियकर तिच्या भावी सासऱ्याच्या प्रेमात पडल्याची घटना घडली आहे. ऐकायला थोडे विचित्र वाटेल पण हे सत्य आहे. एवढेच नाही तर या सासऱ्याच्या बॉयफ्रेंडने आपल्या पार्टनरच्या आनंदासाठी दोघांची 'डेट'ही फिक्स केली आहे. पहा हे प्रकरण नक्की आहे तरी काय
तर, 'डेली मेल' च्या वृत्तानुसार, बॅरी ड्रिविट (Barrie Drewitt) आणि टोनी बार्लो (Tony Barlow) हे ब्रिटनचे पहिले समलिंगी पालक जोडपे (Gay Dads) आहे. या दोघांना सरोगसीद्वारे दोन मुले झाली, एक मुलगा व एक मुलगी. सध्या या मुलांचे वय 19 वर्षे इतके आहे. यातील मुलीचे नाव सॅफरॉन ड्रिविट बार्लो (Saffron Drewitt-Barlow) आहे. नुकतेच सॅफरॉनने आपला प्रियकर स्कॉट हचिसनला लग्नाबद्दल बोलणी करण्यासाठी घरी बोलावले होते. तिला आपल्या प्रियकराची ओळख आपल्या वडिलांशी करून द्यायची होती. मात्र यावेळी, 51 वर्षीय बॅरी ड्रिविट हा पाहताक्षणीच 25 वर्षीय स्कॉट हचिसनच्या प्रेमात पडला. (हेही वाचा: 'पालकांनी अनैसर्गिक संभोग केल्यावर Gay मुले जन्माला येतात'; सायप्रसच्या बिशपने तोडले अकलेचे तारे)
महत्वाचे म्हणजे स्कॉट हचिसनलाही बॅरी आवडला होता. काही दिवसांच्या भेटीनंतर दोघांनी एकमेकांना जाणून घेतले, व आपल्या कुटुंबासमोर प्रेमाची कबुली दिली. हे ऐकून सॅफरॉन प्रथम आश्चर्याचा धक्का बसला, परंतु वडिलांच्या आनंदासाठी तिने हे नाते स्वीकारले. इतकेच नाही तर सॅफरॉनचे दुसरे वडील टोनी बार्लो यांनी आपला समलिंगी पार्टनर बॅरी आणि स्कॉटची पहिली 'डेट' देखील निश्चित केली. टोनी बार्लो सध्या आजारी असतो, त्यामुळे आपल्या पार्टनरसाठी तो दुसरा जोडीदार शोधत होता. अशात स्कॉट भेटल्याने त्याची चिंता दूर झाली आहे. लवकरच बॅरी आणि स्कॉट लग्न करणार आहेत.