Motorcycle Prank | (Photo Credit- X)

प्रँक (Prank) आणि रिल्स बनविण्यासाठी आजची तरुणाई कोणत्याही स्तराला जाते, हे अनेकदा पुढे आले आहे. यात कधी लोक जीवघेणी जोखीम तर पत्करतातच पण अनेकदा इतरांच्या त्रासासही कारण ठरतात. अशाच काही हुल्लडबाजांमुळे पाकिस्तानात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विनाकारण त्रासास सामोरे जावे लागले. पाकिस्तान रेल्वे (Pakistan Railway) आणि प्रवाशांसोबत प्रँक (Motorcycle Prank) करणाऱ्या काही तरुणांना पोलीसांनी चांगलेच बदडले आहे. शिवाय त्यांना ताब्यातही घेतले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

काय आहे व्हिडिओत

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, पाकिस्तानमील रेल्वे रेल्वे रुळावर धावत असतान काही तरुण तेथे उभ आहेत. त्यांच्याकडे एक दुचाकीसुद्धा आहे. ही दुचाकी पाण्यास उभी असून रेल्वे येताच या तरुणांनी ती सुरु केली आहे. दुचाकी पाण्यास सुरु करुन तिच्या पाठिमागच्या चाकाने रेल्वे वर पाणी उडविण्याचा विचीत्र प्रयोग हे तरुण करत आहेत. परिणामी रेल्वेच्या खिडकींमधून पाणी आत जाऊन रेल्वे प्रवासी भिजत आहेत. ते पाहून या तरुणांना आणखीच चेव येतो आणि ते आपली कृती कायम ठेवतात. (हेही वाचा, Animal Cruelty in Pakistan: शेतात चरण्यासाठी घुसलेल्या उंटाचा रागात पायच कापला; नराधम अटकेत, पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील घटना (Watch Video))

अचानक ट्रेन थांबली अन..

दरम्यान, धवती ट्रेन अचानक थांबली आणि ट्रेनमधून पोलीस खाली उतरले. पोलिसांनी या हुल्लडबाज तरुणांना ताब्यात घेतले. त्यातील काही तरुणांना पोलिसांनी बदडूनही काढले. शिवाय त्यांची दुचाकीही ताब्यात घेतली. अखेर हे तरुण आणि त्यांची दुचाकी असा सर्व लवाजमा पोलिसांनी ट्रेनमध्ये घेतला आणि मग ट्रेन पुढे मार्गस्त झाली. (हेही वाचा, Youths Splash Water on Passing Train: टिकटॉक व्हिडिओ बनवणाऱ्या तरुणांनी बाईकच्या साहाय्याने शिंपडले चालू -ट्रेनवर पाणी; संतप्त प्रवाशांनी धु..धु..धुतलं ! (Watch Video))

व्हिडिओ

प्रँक उलटला

धवती ट्रेन जेव्हा अनपेक्षीतपणे थांबली तेव्हा प्रवाशांमध्ये काहीसा गोंधळ उडाला. पण, आपण पकडले जाणार हे तरुणांच्या लक्षात आले. तेव्हा मात्र त्यांनी पळ काढला. पण, पोलिसांनी त्यांना पाटलाग करुन पकडले. विलंब आणि संभाव्य सुरक्षिततेच्या चिंतेमुळे निराश झालेल्या प्रवाशांनीही या तरुणांना पकडण्यासाठी पोलिसांची मदत केली. पाकिस्तानमधील डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म एसए टाईम्सने या घटनेबाबत वृत्त दिले आहे.

व्हिडिओ

दरम्यान, ही काही पहिलीच घटना नाही. भारतातही या आधी अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे देश कोणता जरी असला तरी थोड्याफार प्रमाणाध्ये मानवी मनोवृत्तीत कोणताही बदल नसतो. त्यामुळे रेल्वे किंवा तत्सम यंत्रणा यांच्यासोबत प्रँक करताना काळजी बाळगली पाहिजे असा सूर भारताप्रमाणेच भारताच्या शेजारील देशात उमटला नाही तरच नवल. आपणही येथे या प्रसंगाचा व्हिडिओ पाहू शकता.