Animal Cruelty in Pakistan: पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून प्राण्यांना क्रूरतेची(Animal cruelty) वागणूक दिली जात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. एकाने उंट त्याच्या शेतात चरताना आढळल्याने रागाच्या भरात उंटाचा पुढचा पाय कापला(Chops Off Camel Leg). निर्लज्जपणाचा कळस म्हणून की काय त्या वृद्धाने त्या घटनेचा व्हिडीओ ही रेकॉर्ड केला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच. प्राणी प्रेमींनी निषेध नोंदवला. दोषीवर कारवाई व्हावी अशी मागणी केली. त्यावर पाकिस्तानी(Pakistan Polition) नेत्या शाझिया अट्टा मारी यांनी प्रतिक्रीया देत, 'उंटा(Camel)चा पाय कापण्यात सहभागी असलेल्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे', असे स्पष्टीकरण दिले. पुढे त्या म्हणाली की आरोपी आणि उंटाचा मालक यांच्यात हे प्रकरण मिटले होते. परंतु ते मानवतेला अस्वीकार्य होते, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा-Ruidoso Wildfire Videos: न्यू मेक्सिको येथे जंगलाला लागेल्या वणव्यात 3,300 एकर जमीन जळून भस्मसात; सरकारकडून आपत्कालीन स्थलांतराचे आदेश)

पोस्ट पाहा-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)