Crafted Beds: झोपा, TV पाहा आणि कमवा 25 लाख रुपये; आरामदाई नोकरी, घ्या जाणून
Dream Job | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

नोकरी (Job) म्हटलं की ताण तणाव (Job Stress) आलाच. अनेकांना आपल्या नोकरीत असलेला ताण तणाव नको असतो. असे लोक नेहमीच आपल्याला आरामदाई नोकरी ( Comfort Job) हवी, असे म्हणत असतात. तुम्हीही अशा स्वप्नवत नोकरीच्या (Dream Job) शोधात असाल तर अशी नोकरी मिळू असते आणि ती मिळूही शकते. होय, केवळ TV पाहायचा आणि झोपायचे. झोपेतून जागे झाल्यावर पुन्हा TV पाहायचा अशी जर नोकरी असेल आणि त्या नोकरीसाठी तुम्हाला जर वर्षाकाठी 25 लाख रुपये जर कोणी देत असेल तर? आश्चर्य वाटून घेऊ नका. खरोखरच प्रतिमहिना 2 लाख रुपयांहून अधिक कमाई करुन देणारी नोकरी आहे. क्राफ्टेड बेड्स (Crafted Beds) नामक ब्रिटन (Britain) मधील एक कंपनी ही नोकरी ऑफर करत आहे.

'द मिरर'ने दिलेल्या वृत्तानुसार, लग्ज़री बेड कंपनी क्राफ्टेड बेड्स (Crafted Beds) ने ही नोकरी देऊ केले आहे. या नोकरीसाठी सेवेत रुज होणाऱ्या व्यक्तीस दिवसातील 6-7 तास बेडवरच घालवावे लागतील. या नोकरीसाठी आलेल्या उमेदवारास मॅट्रॅस टेस्टर पदावर नियुक्त केले जाईल. ज्याचे काम केवळ झोपने आणि मैट्रेस बाबक रिव्ह्यू देणे इतकेच असेल. त्यासाठी कंपनी सदर उमेदवारास प्रतिवर्ष 25 लाख म्हणजेच जवळपास 2 लाखांहून अधिक प्रतिमहिना. (हेही वाचा, Cabbage & Broccoli: काय सांगता? शेतातून चक्क कोबी आणि ब्रोकोली तोडण्यासाठी दिला जात आहे 63 लाख रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर)

क्राफ्टेड बेड्सच्या मार्केटींग मॅनेजर ब्रायन डिलन यांनी म्हटले आहे की, या नोकरीसाठी ऑफिसला येण्याचीही गरज नाही. म्हणजे हा जॉब तुम्ही वर्क फ्रॉम होम करु शकता. कंपनी आपल्याला मॅट्रॅसही पाठवून देईल. आपल्याला केवळ कंपनीला प्रत्येक आठवड्यात मॅट्रेसच्या बाबत माहिती द्यावी लागेल. जर आपण चांगल्या प्रकारे लिहू शकत असाल तर आपण ही नोकरी नक्कीच मिळवू शकाल. मात्र, या नोकरीसाठी एक अट मात्र नक्कीच आहे. नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्ती इंग्लंडचा नागरिक असावा किंवा त्याच्याकेड इंग्लंडचे नागरिकत्व असायला हवे. जर तुमचे परिचीत इंग्लंडमध्ये राहात असतील तर तुम्ही नक्कीच त्यांना ही माहिती कळवू शकता.