COVID19 चे महासंकट संपवण्यासाठी 70 टक्के लोकांचे लसीकरण करण्याची गरज, WHO चा दावा
प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: Getty)

डब्लूएचओचे (WHO) युरोपियन डायरेक्टर यांनी शुक्रवारी चेतावणी दिली आहे की, जो पर्यंत कमीत कमी 70 टक्के लोकांचे लसीकरण होत नाही तो पर्यंत कोविड19 चे महासंकट संपणार नाही आहे. डब्लूएचओचे युरोप रिजनल डायरेक्टर हॅन्स क्लूग यांनी म्हटले की, कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा वाढता प्रादुर्भाव हा चिंतेचा विषय आहे. क्लूग यांनी म्हटले की, उदाहरणार्थ आम्हाला माहिती आहे की, B.1617 वेरियंट B.177 (ब्रिटिश वेरियंट) च्या तुलनेत अधिक ट्रांस्मिसेबल आहे. तर B.177 गेल्या स्ट्रेनच्या तुलनेत अदिक ट्रांस्मिसेबल होता.

डब्लूएचओच्या युरोपीय रिजनमध्ये मध्य एशियातील काही देशांसह 53 देश आणि टेरिटरी यांचा समावेश आहे. तसेच 26 टक्के लोकसंख्येला कोविड19 ची पहिली लस दिली पाहिजे. युरोपीय संघात 36.6 टक्के लोकसंख्येला कमीत कमी एकच डोस मिळाला आहे. तर 16.9 टक्के लोकांना दोन्ही डोस मिळणे अद्याप शिल्लक आहे. क्लूग यांनी असे म्हटले की, ज्यावेळी लस कोरोना व्हायरस म्युटेशनच्या विरोधात प्रभावित ठरली आहे. तरी सुद्धा लोकांना सतर्क रहावे लागणार आहे.(Pfizer-BioNTech ची कोविड-19 लस 12-15 वयोगटातील मुलांसाठी वापरण्यास युरोपमध्ये मान्यता)

क्लूग यांनी पुढे असे म्हटले की, आपला सर्वाधिक उत्तम स्पीड आहे. वेळ सध्या आपल्या विरोधात काम करत आहे. तसेच लसीकरणाचा वेग सुद्धा मंदावला जात आहे. पण यामध्ये वेग वाढवला पाहिजे. याच दरम्यान, डब्लूएचओच्या आपत्कालीन चीफ मायकल रयान यांनी म्हटले की, कोविड19 महासंकटावर उपाय काढण्याच्या प्रयत्नात राजकरण आडवे येत आहे. वैज्ञानिकांना केमिस्ट्री सोडवण्यासाठी काम करण्यासाठी जागेची आवश्यकता आहे. त्यांनी म्हटले की, आम्ही विज्ञानाला राजकरणापासून वेगळे करण्यासाठी सांगू.