नेदरलँडमधून (Netherlands) हत्येचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. देशाच्या उत्तर भागातील एका रुग्णालयात मार्च 2020 ते मे 2022 या कालावधीत 24 कोरोनाव्हायरस रूग्णांना ठार मारल्याप्रकरणी एका पुरुष नर्सला अटक करण्यात आली आहे. रुग्णालयाचे अधिकारी आणि पीडितेच्या नातेवाईकांनी ही माहिती दिली आहे. पब्लिक प्रोसिक्युशन सर्व्हिसच्या अधिकार्यांनी उघड केले की, नर्स थेओ वेला (Theo V.-30) या आठवड्याच्या सुरुवातीला ‘विल्हेल्मिना हॉस्पिटलमधील रूग्णांच्या मृत्यूमध्ये सहभागी असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली होती.
थिओ वे हॉस्पिटलच्या फुफ्फुसांच्या वॉर्डमध्ये काम करत होता. कोरोना महामारी सुरू होण्याच्या काही महिन्यांपूर्वीच त्याला नर्स म्हणून नियुक्त करण्यात आले होते. तो सध्या पोलीस कोठडीत आहे. सरकारी वकिलांनी मृत रुग्णांच्या संख्येबद्दल तपशील देण्यास नकार दिला. तरीही पोलिसांनी एका रुग्णाच्या नातेवाईकाला सांगितले की किमान 24 मृत्यूंचा तपास सुरू आहे.
या सर्व रुग्णांवर कोविड-19 बाबत उपचार सुरू होते. यामध्ये एप्रिल 2020 मध्ये निधन झालेल्या रुग्णांपैकी एका रुग्णाच्या मुलाने स्थानिक एडी वृत्तपत्राला सांगितले की, त्याने रुग्णांच्या मृत्यूबाबत प्रश्न उपस्थित केले. हे कसे कसे घडले? हॉस्पिटलच्या पुरुष नर्सने हे कसे केले? विविध मार्गांनी असे अनेक प्रश्न विचारल्यावरही रुग्णालयातील लोकांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. त्या व्यक्तीने पुढे सांगितले की, या पुरुष नर्सने त्याच्या वडिलांची हत्या केल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही, परंतु तपास सुरू असताना काहीतरी गडबड असल्याचे दिसून आले आहे. (हेही वाचा: Yemen Stampede: येमेनच्या राजधानीत चेंगराचेंगरीची घटना, 78 नागरिकांचा मृत्यू)
मृतांचे कुटुंबीय त्यांच्या प्रियजनांचे नक्की काय झाले आणि हॉस्पिटलमध्ये असे कसे घडले असेल याची उत्तरे शोधत आहेत. याबाबत कसून तपास चालू आहे. परंतु या नर्सवर अद्याप गुन्हा दाखल केला गेला नाही. दरम्यान, रुग्णांना जाणूनबुजून मारल्याचा आरोप नर्सवर होण्याची ही पहिलीच वेळ नाही. तत्पूर्वी, जर्मनीतील नर्स नील्स हॉगेलने कंटाळवाणेपणा आणि थ्रिलसाठी डझनभर रुग्णांची हत्या केल्याची कबुली दिली होती. त्याला 85 खुनांसाठी दोषी ठरवण्यात आले, ज्यामुळे तो आधुनिक इतिहासातील सर्वात प्राणघातक सीरियल किलर ठरला आहे.