Jacinda Ardern | (Photo Credit: ANI)

न्यूजीलैंडच्या पंतप्रधान जैसिंडा अर्डन (Jacinda Ardern) यांनी गुरुवारी (8 मार्च) एक महत्त्वपर्ण घोषणा केली आहे. ही घोषणा भारतीय प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जैसिंडा आर्डन यांनी कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमितांची प्रमाण वाढल्याने न्यूझीलंडमध्ये (New Zealand) प्रवेश करणाऱ्या भारतीय प्रवाशांना बंदी घातली आहे. ही बंदी 28 एप्रिल पर्यंत कायम असणार आहे. न्यूजीलंडने हा निर्णय देशात कोरोना संक्रमितांची संख्या 1 लाखांहून अधिक झाल्यानंतर घेतला आहे. कोरोना व्हायरस जागतीक महामारी आहे. या महामारीचा फटका जगभरातील अनेक देशांना बसतो आहे. त्यामुळे प्रत्येक देश सावध पावले टाकताना दिसत आहे.

देशात बुधवारी नव्या कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 1.15 लाखांवर पोहोचली. कोरोनाच्या जागतिक महामारीत सुरुवातीच्या काळात होणाऱ्या संक्रमणापासून आतापर्यंतची ही एका दिवसातील सर्वाधिक संख्या आहे. देशात संक्रमितांची संख्या वाढून सुमारे 1,28,01,785 इतकी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सांगितले की, तीन दिवसांमध्ये असे दुसऱ्यांदा झाले आहे. जेव्हा कोरोना संक्रमितांची संख्या एक लाखांहून अधिक नोंदली गेली आहे. (हेही वाचा, Coronavirus: Frozen Food पासून COVID-19 विषाणूची उत्पत्ती? WHO अहवाल काय सांगतोय पाहा)

भारतात गेल्या 24 तासात 1,26,789 नव्या कोरोना व्हायरस संक्रमितांची नोंद झाली आहे. तर 59,258 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या 24 तासात 685 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे,अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण संक्रमितांची संख्या 1,29,28,574 इतकी झाली आहे. आतापर्यंत 1,18,51,393 कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. देशातील उपचार सुरु असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या 9,10,319 इतकी आहे. तर आतापर्यंत तब्बल 16,68,62 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 9,01,98,673 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.