Coronavirus: Frozen Food पासून COVID-19 विषाणूची उत्पत्ती? WHO अहवाल काय सांगतोय पाहा
WHO (PC - Facebook)

कोविड 19 (COVID-19) म्हणजेच कोरोना व्हायरस (Coronavirus) विषाणुची उत्पत्ती कशी झाली याबाबत जगभरात संशोधन सुरु आहे. अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत. यात हा विषाणू 2019 मध्ये वुहान येथील प्रयोगशाळेत जन्माला आला इथपासून ते प्रोजन फूड (Frozen Food) च्या माध्यमातून हा विषाणू तयार झाला इथपर्यंत दावे केले जात आहेत. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात कोल्ड चेन कंटेमिनेशनल मुळे कोरोना निर्मिती अथवा प्रसाराची शक्यता कमी आहे, असे म्हटले.

वृत्तसंस्था AFP ने दिलेल्या वृत्तानुसार, जागतिक आरोग्य संघटनेकडून नेमण्यात आलेले पथक आणि चीनी वैज्ञानिक यांनी संयुक्तरित्या केलेल्या पाहणी आणि तपासात म्हटले आहे की, कोल्ड चेन कंटेमिनेशनल मुळे कोरोना निर्मिती अथवा प्रसाराची शक्यता कमी आहे. त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की, डिसेंबर महिन्यात चीनमध्ये कोविडची फअरोजन फूडमुळे सुरुवात असाधरण राहिली असावी. कारण त्या काळात हा व्हायरस फार मोठ्या प्रमाणात आढळला नाही. संशोधकांना संशय आहे की, कोरोना विषाणू हा वटवागळांच्या माध्यमातून पसरला असावा. (हेही वाचा, कोरोना विषाणू वुहान लॅबमधून नव्हे, तर प्राण्यांपासून मानवापर्यंत पोहोचला; जागतिक आरोग्य संघटनेचा दावा)

दरम्यान, अवघ्या जगाला कोरोना व्हायरसने संकटाकत टाकले आहे. आतापर्यंत संपूर्ण जगाचा विचार करता 27, 83,000 नागरिकांचा कोरोना व्हायरस संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. ही जगभरातील आकडेवारी आहे. आतापर्यंत 12 , 71,000 नागगरिकांना कोरोना व्हायरस झाला आहे. यापैकी 7 कोटी 20 लाख लोक उपचरा घेऊन बरे झाले आहेत. सध्यास्थितीत जगभरात विविध ठिकाणी 5,23,000 लाख लोकांवर प्रत्यक्ष उपचार सुरु आहे.