कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे गेले कित्येक आठवडे भारतासह जगातील अनेक देशांमध्ये लॉक डाऊन (Lockdown) सुरू आहे. अशात व्यवसाय ठप्प आहेत, उद्योगधंदे बंद झाले आहेत, परिणामी लोकांच्या जेवणाची वाणवा निर्माण झाली आहे. अशात पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना, वर्ल्ड बॅंकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास (World Bank President David Malpass) म्हणाले की, कोरोना व्हायरस इम्पॅक्ट आणि त्यामुळे विकसित अर्थव्यवस्था बंद झाल्यामुळे, 6 कोटीहून अधिक लोक गरीबीच्या दलदलीत अडकण्याची शक्यता आहे. हे लोक दररोज केवळ 142 रुपयांवर जगत आहेत. यातील असे अनेक लोक आहेत ज्यांना दोन वेळचे पुरेसे अन्नही उपलब्ध होत नाही.
मालपास पुढे म्हणाले, अलीकडच्या काळात आपण गरिबी संपुष्टात आणण्याच्या दृष्टीने जी काही प्रगती केली आहे, त्याच्या कितीतरी दूर आपण या संकटामुळे जाणार आहोत. कोरोना संकटाला तोंड देण्यासाठी जागतिक बँकेने 100 विकसनशील देशांना 160 अब्ज डॉलर्स (12.16) देण्याची घोषणा केली आहे. ही सर्व मदत 15 महिन्यांच्या कालावधीत दिली जाईल. या 100 देशांमध्ये जगातील 70 टक्के लोक राहतात.
यापैकी 39 देश हे आफ्रिकेतील उप-सहारन भागातील आहेत. एकूण प्रकल्पांपैकी एक तृतीयांश अफगाणिस्तान, चाड, हैती आणि नायजर यासारख्या संवेदनशील आणि अतिरेकीवाद प्रभावित भागात आहेत. या देशांच्या मदतीसाठी देशांनुसार कार्यक्रम तयार करण्यात आला आहे, जेणेकरून हे देश कोरोना संकटाचा सामना करु शकतील. या कार्यक्रमाद्वारे त्या-त्या देशांची आरोग्य यंत्रणा बळकट होईल, असे मालपोस म्हणाले. (हेही वाचा: जगभरात 51 लाखांहून अधिक नागरिकांना कोरोना व्हायरस संक्रमन, 3 लाख 32 हजार पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू)
दरम्यान, गेल्या आठवड्यात जागतिक बँकेने सामाजिक सुरक्षा पॅकेज म्हणून भारताला, एक अब्ज डॉलर्स म्हणजेच साडेसातशे कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. गरीब आणि साथी आजाराला बळी पडलेल्या कुटुंबांसाठी भारत सरकारच्या अथक प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर, जागतिक बँकेने याला मंजुरी दिली. दिले आहे.