कोरना व्हायरस (Coronavirus) रुग्णांची जगभरातील संख्या अद्यापही वाढतच आहे. अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स यूनिवर्सिटीने दिलेल्या आकडेवारीनुसार जगभरातील कोरोना व्हायरस संक्रमितांचा आकडा 51 लाखांच्याही पुढे गेला आहे. तर कोरोना व्हायरस संक्रमनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 3 लाख 32 हजारांच्याही पुढे गेला आहे. जॉन्स हॉपकिन्स यूनिवर्सिटी (Johns Hopkins University) संचलीत सेंटर फॉर सिस्टम साइंस एंड इंजीनियरिंग (CSSE) ने आकडेवारीनुसार जगभरात शुक्रवारी सकाळपर्यंत जगभरात कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या 51 लाख 01 हजार 967 तर मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 3 लाख 32 हजार 900 इतकी राहिली आहे.
कोरोना व्हायरस संक्रमित सर्वाधिक रुग्ण हे अमेरिकेत आहे. ताज्या आकडेवारीनुसार अमेरिकेत कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या 15 लाख 57 हजार 140 इतकी आहे. तर, मृत्यूंची संख्या 94 हजार 709 इतकी आहे. अमेरिकेनंतर कोरना प्रभावित देश म्हणून रशियाचा क्रमांक आहे. रशियात आतापर्यंत 3 लाख 17 हजार 554 नागरिकांना कोरोना व्हायरसची बाधा झाली आहे. (हेही वाचा, चीन सरकारचा मोठा निर्णय; वुहानमध्ये वन्य प्राण्यांची विक्री व मांस खाण्यावर पूर्णपणे बंदी, कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या वाढल्याने नवा निर्बंध लागू)
विविध देशातील कोरोना रुग्णांची संख्या
अमेरिका- 15 लाख 57 हजार 140
रशिया- 3 लाख 17 हजार 554
ब्राझिल- 3 लाख 10 हजार 087
इग्लंड- 2 लाख 52 हजार 246
स्पेन- 2 लाख 33 हजार 037
इटली- 2 लाख 28 हजार 06
फ्रान्स- 1 लाख 81 हजार 951
जर्मनी- 1 लाख 79 हजार 021
तुर्की- 1 लाख 53 हजार 548
इराण - 1 लाख 29 हजार 341
भारत - 1 लाख 18 हजार 226
सीएसएसईने दिलेल्या आकडेवारीनुसार अमेरिकेनंतर मृत्यूचे सर्वाधिक प्रमाण हे इंग्लंडमध्ये आहे. इंग्लंडमध्ये 36 हजार 124 नागरिकांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. कोरना व्हायरसुमळे मृत्यूचे प्रमाण 10 हजारपेक्षाही अधिक संख्येत असलेल्या देशांमध्ये इटली (32 हजार 486 ), फ्रान्स (28 हजार 218 ), स्पोन (27 हजार 940), ब्राझिल (20 हजार 047 ) आदी देशांचा समावेश आहे.