कोरोना विषाणूबद्दल माहिती: अमेरिकेच्या (US) गृह सुरक्षा विभागाने आपल्या एका प्रतिक्रियेत म्हटले आहे की, स्वच्छ सूर्य प्रकाश, उष्ण तापमान आणि दमट वातावरणात कोरोना व्हायरस (Coronavirus) मरतो. तो फारसा प्रभावी ठरत नाही. एका प्रयोगशाळेत नुकतेच याबाबत संशोधन झाले. अमेरेक व्हाइट हाउस (White House) द्वारा हे संशोधन गुरुवारी (23 एप्रिल) प्रसिद्ध करण्यात आले. आयएएनएस (IANS) या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. दरम्यान, आजघडीला जगभरातील सर्व देशांच्या तुलनेत अमेरिकेत कोरोना व्हायरस (Covid-19) बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण प्रचंड आहे.
आयएएनएस वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, तीव्र सूर्य प्रकाशात कोविड 19 मरतो. उष्ण आणि दमट वातावरणात कोरोना व्हायरसला प्रचंड नुकसान पोहोतचे. त्याची क्रियाशक्ती जवळपास निम्म्यापेक्षा अधिक कमी होते. कोरोना व्हायरस या साथीच्या आजारात अमेरिकेतील मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. आतापर्यंत अमेरिकेत सुमारे 8 लाख 60 हजार पेक्षा अधिक नागरिकांना कोरोना व्हायरस संक्रमन झाले आहे. यातील सुमारे 50 हजार नागरिकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
कोरोना व्हायरस आणि तापमान याबाबत एक संशोधन नुकतेच करण्यात आले. या शोधाबाबत अनेक वेबसाईट्सवर लिहिले बोलले जाऊ लागले आहे. मात्र, अमेरिका सरकारने कोविड 19 वर तापमानाबाबतच्या संशोधनावर प्राथमिक रुपात मान्यता दर्शवली आहे. (हेही वाचा, Coronavirus: COVID-19 विषाणू तयार करण्यात आलेला नाही- जागतिक आरोग्य संघटना)
अमेरिकेच्या गृह विभागाने विज्ञान आणि तंत्रज्ञान संचालनालय (Directorate of Science and Technology) प्रमुख बिल ब्रायन यांनी म्हटले आहे की, हे आजवरचे आमचे सर्वात महत्त्वपूर्ण संशोधन आहे. सूर्याचा तीव्र प्रकाश असलेल्या जमीनीच्या पृष्ठभागावर हा व्हायरस फारसा प्राभाव दाखवू शकत नाही. उष्ण आणि दमट हवामान तसेच तीव्र सूर्यप्रकाश असलेल्या ठिकाणी हा व्हायरस कमी प्रभाव टाकताना आढळला आहे.