Coronavirus: COVID-19 विषाणू तयार करण्यात आलेला नाही- जागतिक आरोग्य संघटना
Coronavirus & WHO | (Photo credit: archived, edited, symbolic images)

जागतिक आरोग्य संघटना (World Health Organization) ने म्हटले आहे की, वर्तमान स्थितीत उपलब्ध असलेली परिस्थीती आणि पुरावे पाहता कोरोना व्हायरस (Coronavirus) म्हणजेच COVID-19 विषाणू नैसर्गिक आहे. तो कोणत्याही प्रकारे छेडछाड करुन निर्माण केलेला आहे अथवा जाणीवपूर्वक बनविण्यात आला आहे असे वाटत नाही. वृत्तसंस्था सिन्हुआने ग्लोबल हेल्थ वॉच डॉग चा हवाला देत आयएएनएस (IANS) या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.

आयएएनएसने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, ''अनेक संशोधकांनी सार्स-सीओवी-2 ची जीनोमिक वैशिष्ट्य पाहून विश्लेशन करण्यात यशस्वी झाले आहेत. या त्यांना आढळले आहे की, कोविड-19 हा विषाणून मानवनिर्मित अथवा अनैसर्गिक किंवा प्रयोगशाळेत तयार केल्याचा कोणताही पुरावा मिळू शकला नाही.'' जागतिक आरोग्य संघटनेने अधिक जोर देत म्हटले आहे की, कोरोना व्हायरस जर मानवनिर्मित असता तर त्यात जीनोमिक सीक्वेंस ज्ञात घटकांचे मिश्रण आढळून आले असते. मात्र, संशोधकांना असे कोणतेच घटक सापडले नाहीत. (हेही वाचा, UK: Oxford मध्ये कोरोना व्हायरस लसीच्या चाचणीला सुरुवात; 2 वॉलंटियर्सवर करण्यात आला प्रयोग)

जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, हा विषाणू जानेवारी 2020 मध्ये ओळखण्यात आला. 11-12 जानेवारीला हा व्हायरस सार्वजनिक रुपात ज्याला जेनेटिक सीक्वेंस म्हणून संबोधण्यात आला. दरम्यान, हा व्हायरस अत्यंत विनाशकारी ठरत असून, जगभरात शुक्रवार सकाळपर्यंत कोविड 19 विषाणुची बाधा झालेल्या रुग्णांच्या मृत्यूचा आकडा 1 लाख 90 हजार 788 इतका होता. संपूर्ण जगभरात 27 लाख 8 हजार 479 नागरिक कोविड 19 या साथिच्या मगरमिठीत अडकले आहेत.