कोरोना व्हायरस वरील लसीची पहिली चाचणी ऑक्सफोर्डमध्ये करण्यात आली आहे. पहिल्या ट्रायलसाठी तब्बल 800 स्वयंसेवकांना लस देण्यात आल्याची माहिती BBC ने दिली आहे. 800 पैकी 400 स्वयंसेवकांना कोविड 19 ची लस देण्यात आली तर 400 जणांना कोरोनापासून संरक्षण करणारी लस देण्यात आली. आपल्याला कोणती लस दिली आहे याची माहिती केवळ डॉक्टरांना आहे. स्वयंसेवकांना याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
कोरोना वरील या लसीची निर्मिती करण्यासाठी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी मधील टीम गेल्या 3 महिन्यांपासून काम करत आहे. Vaccinology चे प्रोफेसर Sarah Gilbert यांच्या नेतृत्वाखाली या लसीची निर्मिती करण्यात आली आहे. लस पूर्णपणे वापरता आणण्यापूर्वी या लसीची चाचणी करुन त्याच्या परिणामांचा डेटा गोळा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यानंतरच अनेक लोकांना कोविड 19 ची ही लस दिली जाईल. तसंच मला या लसीबद्दल खात्री असल्याचा आत्मविश्वासही Sarah Gilbert यांनी बोलताना व्यक्त केला. मला या लसीबद्दल 80% खात्री आहे. मात्र मी आताच काही बोलत नाही. पण ही लस नक्कीच खूप उपयुक्त ठरेल असे मी सांगू शकते. (सप्टेंबरपर्यंत कोरोना विषाणूवर लस उपलब्ध होणार? ब्रिटनमधील Oxford विद्यापीठातील प्राध्यापकांचा दावा)
या लसीची निर्मिती adenovirus या मृत व्हायरसपासून बनवण्यात आली आहे. त्यात विशेष बदल करुन मानवी शरीरासाठी उपयुक्त अशी लस तयार करण्यात आली आहे. Oxford team ने Mers विरुद्धही लस तयार केली आहे. Mers हा वेगळ्या प्रकारचा कोरोना व्हायरस आहे आणि या लसीच्या क्लिनिकल ट्रायल्सचा परिणाम अत्यंत चांगला आहे.
कोरोना व्हायरसची लागण झालेले व्यक्ती आणि त्यांना लस दिल्यावर होणारा परिणाम यावरुन या लसीचा प्रभाव तपासण्यात येईल. मात्र युके मध्ये कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढल्यास समस्या येऊ शकते.
Oxford व्हॅक्सिन ग्रुपचे डिरेक्टर Andrew Pollard या क्लिनकल ट्रायलचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी सांगितले की, "कोरोना व्हायरसच्या साथीची लाटेसह आमचे प्रयत्नही सुरु आहेत. मात्र त्या लाटेच्या वेगाने आम्हाला जाता आले नाही तर या लसीची कार्यक्षमता तपासणे शक्य होणार नाही. मात्र कोरोना अजून नष्ट झालेला नसल्यामुळे भविष्यात अजूनही रुग्णसंख्या वाढेल."
लसीच्या क्लिनिकल ट्रायलसाठी वैद्यकीय कर्मचारांना सहभागी करुन घेण्यास प्राधान्य दिले आहे. कारण इतरांच्या तुलनेत त्यांना कोरोनाची लागण होण्याची संभावना अधिक असते. येत्या काळात 5000 स्वयंसेवकांवर या लसीचे ट्रायल करण्यात येईल. तसंच यासाठी कोणतेही वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही.