Photo Credit - X

Conjoined Twin Abby Hensel is Married : जुळ्या पण एकमेकींशी शारिरीक दृष्या जोडल्या गेलेल्या ॲबी आणि ब्रिटनी हेन्सेल यांची कहानी सर्वांनाच माहित आहे. त्या जन्मताच एकमेकींशी जोडल्या गेल्या होत्या. त्या दोघींपैकी आता ॲबी हिने लग्न केल्याचं समोर आलं आहे. 2021 मध्ये तिने यूएस आर्मी मॅन जोश बॉलिंग यांच्याशी गुपचूप लग्नगाठ बांधली अश्या चर्चा होत्या. मात्र, खंर काय ते समोर आलं नव्हता. आता पहिल्यांदाच ते दोघे एकत्र पहायला मिळाले. ॲबी आणि ब्रिटनी हेन्सेल यांनी 1996 मध्ये द ओप्रा विन्फ्रे शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्या प्रकाश झोतात आल्या होत्या. (हेही वाचा : World's Largest Snake Found Dead: ॲना ज्युलिया नावाचा जगातील सर्वात मोठा साप Amazon Rainforest मध्ये मृतावस्थेत सापडला)

ॲबी हेन्सेलने तिचे फेसबुक प्रोफाइल पिच्चर बदलले आहे. ज्यात तिने सोशल मीडिया अकाउंट तिची बहीण ब्रिटनी आणि नवरा जोश बॉलिंगसोबतचा फोटो ठेवला आहे. त्याशिवाय, त्यांच्या एकत्र डान्सचाही व्हिडीओ समोर आला आहे. ॲबी आणि ब्रिटनी हेन्सेल युरोपमध्ये मिनेसोटा येथे राहतात. जिथे दोन्ही बहिणी क्लासेस घेतात. ॲबी आणि ब्रिटनी यांचा जन्म 1990 मध्ये झाला. दोघींचा चेहरा फक्त वेगळा आहे. बाकी सर्व शारिरीक अवयव सामायिक आहेत. ॲबी उजव्या बाजूला आणि ब्रिटनी डाव्या बाजूला आहे. (हेही वाचा :South Africa Bus Accident : भाविकांच्या बसचा भीषण अपघात; बस दरीत कोसळून ४५ जणांचा मृत्यू, ८ वर्षांचा चिमुकला बचावला)

जेव्हा त्यांचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या पालकांनी विभक्त शस्त्रक्रिया करण्याचा पर्याय नाकारला. दोघीही त्यांचे जीवन छान जगत आहेत. एकत्र प्रवास करणे, शिक्षण, करिअर घडवणे यासह रोजच्या जीवनातील अनेक कामे त्या एकत्र करतात.