Canada Shooting: कॅनडा मध्ये Edmonton भागात झालेल्या गोळीबारात दोघांचा  मृत्यू; मृतांमध्ये एक व्यक्ती भारतीय वंशाची!
Dead Body | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

कॅनडा (Canada)  मध्ये दोन जणांवर झालेल्या गोळीबारात एक भारतीय वंशाची व्यक्ती मृत्यूमुखी पडल्याची घटना समोर आली आहे. कॅनडा मध्ये south Edmonton भागात हा गोळीबार झाला असून मृत व्यक्ती Buta Singh Gill होता. Buta Singh Gill हे Edmonton मधील Gill Built Homes चे मालक होते.

प्रेस रिलीज मध्ये Edmonton police कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, Cavanagh Boulevard Southwest आणि Cherniak Way Southwest मध्ये गोळीबार झालेल्या घटनेची पोलिसांनी माहिती घेतली आहे. southwest Edmonton मध्ये झालेल्या दोन व्यक्तींवरील गोळीबाराचा पोलिस तपास करत आहेत. सोमवारी ही घटना दुपारची 12 च्या सुमारास घडली आहे. पोलिसांना गोळीबाराची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे 3 जखमी आढळले. या गोळीबारात एक 49 वर्षीय आणि दुसरा 57 वर्षीय व्यक्ती मृत पावला आहे. तर 51 वर्षीय व्यक्ती गंभीररित्या जखमी आहे. जीवघेण्या जखमा असताना पॅरामेडिक्सने या व्यक्तीला हॉस्पिटल मध्ये नेले.

Edmonton Police Service च्या हत्याकांड विभागाकडे हे प्रकरण आहे आणि सध्या पोलिसांच्या रडार वर कुणीही संशयित नाही. पुढील 1-2 दिवसात मृतदेहाच्या ऑटोप्सी होणार आहेत. मृतांपैकी एकाच्या कुटुंबियांनी Buta Singh Gill च्या मृतदेहाची ओळख पटवली असल्याचं CTV News Edmonton चं वृत्त आहे.