Bullets In Baby Diaper | (Photo credit: archived, edited, representative image)

न्यूयॉर्क (New York airport) शहरातील लागार्डिया विमानतळावर (LaGuardia Airport) पोलिसांना एक डिस्पजेबल बेबी डायपर (Bullets In Baby Diaper) आढळून आले. पोलिसांना या डायपरचा संशय आल्याने केलेल्या तपासणीत धक्कादायक खुलासा झाला. ज्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. यंत्रणांना या डायपरमध्ये बंदुकीच्या 17 गोळ्या आढळून आल्या. विमानतळावर सुरक्षा चेकपॉईंटवर एक्स-रे स्कॅन करताना अलार्म वाजला. त्यामुळे पोलिसांनी एका प्रवाशाला तपासणीसाठी बाजूला घेतले. हा अलार्म त्याच्याकडील बॅगमध्ये असलेल्या सामनातील डायपरमुळे वाजत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी अधिक तपासणी केली असता तपशील पुढे आला. न्यू यॉर्कच्या वाहतूक सुरक्षा प्रशासन (TSA) ने याबाबत माहिती दिली आहे.

TSA ने दिलेल्या माहितीनुसार, अर्कान्सचा एक व्यक्ती शिकागोच्या मिडवे विमानतळाकडे निघाला होता. चेक पॉइंटवर तो सामान घेऊन पोहोचला. या वेळी सुरक्षा अलार्म वाजला. पोलिसांनी त्याला थांबवले आणि त्याची चौकशी सुरु केली. या वेळी पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्याने या गोळ्यांबाबत कोणतीही कल्पना नाही. आपण त्याबाबत अनभिज्ञ असल्याचे म्हटले आहे. टीएसए पोलिसांनी या प्रवाशाचे नाव जाहीर केले नाही. मात्र, त्याच्याकडून 9mm इतका दारुगोळा (गोळ्या) जप्त करण्यात आल्या आहेत. जो त्या बेकायदेशीरपणे घेऊन निघाला होता. विमानतळाचे व्यवस्थापन करणार्‍या न्यूयॉर्क आणि न्यू जर्सीच्या पोर्ट ऑथॉरिटी आणि क्वीन्स डिस्ट्रिक्ट अॅटर्नी कार्यालयाकडून या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. सदर प्रवाशाची चौकशी सुरु आहे. (हेही वाचा, Girl Kills Classmate: चौदा वर्षीय मुलीचा वर्गमित्रांवर गोळीबार; एक ठार, पाच जखमी)

LaGuardia विमानतळावर सुरक्षेच्या दृष्टीने धक्कादायक वाटावी अशी ही घटना अलिकडील काळातील सर्वात ताजी घटना आहे. ज्यामध्ये प्रवाशाने हवाई वाहतुकीदरम्यान बंदुकीच्या गोळ्या किंवा बंदूक सोबत बाळगण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या महिन्यात एका प्रवाशाच्या बॅगमध्ये Nike स्नीकर्समध्ये लपवलेले TSA अधिकाऱ्यांना आढळून आले. त्याचयाकडे 45-कॅलिबर पिस्तूल आणि लोड केलेले मॅगझिन सापडले. बंदुकांना चेक केलेले सामान म्हणून परवानगी आहे. परंतू, त्या भक्कम आवरण असलेल्या पेटीमध्ये अनलोड स्थितीमध्ये योग्य रित्या बंद केलेल्या असाव्यात. त्या कोणत्याही प्रकारे छुप्या अथवा संशयास्पदरित्या घेऊन जाता येणार नाहीत.

दरम्यान, जानेवारी 2021 मध्ये Mentos च्युइंग गम कंटेनरमध्ये लपवून ठेवलेल्या 13 गोळ्या आढळून आल्या होत्या. याबाबत केलेल्या चौकशीमध्ये प्रवाशाने सांगितले की, त्या सोबत बाळगण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता. मात्र, आपण विसरल्यामुळे त्या नजरचुकीने सोबत आल्या आहेत. या प्रकारानंतर विमानतळावर सतर्कता वाढवली असून सुरक्षेत वाढ केली आहे.